आज पुण्यात नवे ६२९९ रुग्ण आढळले
पुणे : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. आज पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल ६२९९ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा वाढला असून तो आता ४६८६३ झाला आहे.
आज पुण्यात ५३७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात ११ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार १९२ वर गेली आहे.
– दिवसभरात ६२९९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ५३७५ रुग्णांना डिस्चार्ज.
– ११ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
६०६३७९
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४६८६३
– एकूण मृत्यू – ९१९२
– एकूण डिस्चार्ज-५५०३२४
– दिवसभरात झालेल्या टेस्ट्- १७८२५
COMMENTS