आज पुण्यात नवे ५४८० रुग्ण आढळले
पुणे : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडत आहे. आज पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल ५४८० रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा वाढला असून तो आता २८५४२ झाला आहे.
आज पुण्यात २६७४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात १ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार १३४ वर गेली आहे.
– दिवसभरात ५४८० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २६७४ रुग्णांना डिस्चार्ज.
– 0१ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
५४८४६९
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २८५४२
– एकूण मृत्यू – ९१३४
– एकूण डिस्चार्ज- ५१०७९३
– दिवसभरात झालेल्या टेस्ट्- २०१४९
COMMENTS