Pune Congress : पंतप्रधान संसदेत खोटे बोलले आणि आपल्या अपयशाचे खापर त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसवर फोडले : रमेश बागवे   

HomeBreaking Newsपुणे

Pune Congress : पंतप्रधान संसदेत खोटे बोलले आणि आपल्या अपयशाचे खापर त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसवर फोडले : रमेश बागवे  

Ganesh Kumar Mule Feb 10, 2022 1:19 PM

Congress Pune | केंद्रातील मोदी सरकार सर्वसामान्यांचे नसून केवळ हम दो हमारे दो चे – अरविंद शिंदे
BJP Vs NCP | राष्ट्रवादीचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने आंदोलन
Congress | Fuel price hike | हात गाडीवर पेट्रोल डिझेलचे बॅरल ठेवून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन

पंतप्रधान संसदेत खोटे बोलले आणि आपल्या अपयशाचे खापर त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसवर फोडले : रमेश बागवे

 

पुणे :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत असे सांगितले की, महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशात कोरोना पसरला. पंतप्रधानांच्या या वक्तव्‍याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यव्‍यापी आंदोलनाची घोषणा केली. त्यानुसार आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिका जवळील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर निदर्शने -आंदोलन करण्यात आले.

पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणा दिल्या. ‘‘महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या पंतप्रधान मोदींचा धिक्कार असो’, ‘माफी मागों माफी मागों, मोदीजी माफी मागों’ अशा प्रकारचे फलक घेवून कार्यकर्ते निदर्शनाच्या ठिकाणी जमले होते.

      यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘१२ फेब्रुवारी २०२० साली राहुल गांधी यांनी मोदी सरकारला कोरोना संसर्गाबाबत, योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे असे सांगितली होते. परंतु तात्कालीन केंद्रिय आरोग्य मंत्री यांनी त्या विषयाचे गांभीर्य समजून न घेता राहुल गांधीची खिल्ली उडविली होती. पतंप्रधान मोदी यांनी चीनवरून येणाऱ्या विमानावर बंदी घातली नाही. ते नमस्ते ट्रम म्हणत अमेरीकेचे तात्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाहुणचार मग्न होते. परिणामी देशात कोरोना मोठ्या प्रमाणावर पसरला. २४ मार्च २०२० रोजी कोठलेही पूर्वनियोजन न करता पंतप्रधांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे गोरगरीब, कष्टकरी, मजूर व छोट्या व्‍यावसियिकांचे हाल झाले.‌ भितीपोटी गोरगरीब कष्टकरी मजूर आपल्या गावाकडे हजारो किलोमीटर चालत गेले. यात त्यांना वाटेत अन्न व पाणी न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडले. मोदी सरकारने कोरोना संसर्ग हाताळण्यात हलगर्जीपणा दाखविला. कोरोनावर मात करण्यासाठी उपयोजना न ठरवता मोदींनी देशातल्या जनतेला थाळी वाजवा, टाळी वाजवा, घराची लाईट बंद करून आपल्या घराबाहेर दिवे पेटवण्यास भाग पाडले. आपले अपयश झाकण्यासाठी ते महाराष्ट्र काँग्रेसवर आपले खापर फोडत आहे. पंतप्रधान संसदेत खोट बोलले आणि त्यांनी जाणून बुजून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या व देशाच्या जनतेची माफी मागावी अन्याता जनता त्यांना सत्तेतून पायउतार केल्याशिवाय राहणार नाही.’’

      माजी आमदार मोहन जोशी म्हणाले की, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेत आल्यापासून प्रत्येकवेळी कोणत्या न कोणत्या कारणावरून महाराष्ट्राचा अपमान करीत आहे. संसदेत कोरोना विषयी ते खोटे बोलून देशातील जनतेची दिशाभूल करीत आहेत.   महाराष्ट्रात भाजपाची सरकार आली नाही म्हणून आकसापोटी महाराष्ट्राचा अपमान करीत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी त्यांनी सुरूवातीच्या काळात कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही त्यामुळे लाखो देशवासियांच्या जीव गेला. गंगेत बहुसंख्य प्रेत फेकून देण्यात आले होते. अनेकांचे संसार उध्वस्त होऊन मुले अनाथ झाले. राहुल गांधींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील संसदेत आपली भूमिका मांडली. त्यांनी सरकार अनेक धोरणावर कसे अपयशी ठरले याचा पर्दाफाश केला. परंतु पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींच्या भाषणावर न बोलता निवडणुकीचे भाषण करत होते. भारताच्या संसदेत आजपर्यंत अशा पध्दतीने कोणतेही पंतप्रधान बोलले नाही. महाराष्ट्र काँग्रेसने यु.पी. आणि बिहारच्या लोकांना रेल्वेने आपल्या गावाला पाठविले त्यामुळे कोरोना पसरला असे खोटे आरोप पंतप्रधानांनी केले. रेल्वे तर केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. मग महाराष्ट्र काँग्रेसने कसा काय कोरोना पसरविला याचे उत्तर द्यावे.’’

      यानंतर नगरसेवक अरविंद शिंदे यांचेही भाषण झाले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ॲड. अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, संजय बालगुड, कमल व्‍यवहारे, दिप्ती चवधरी, गटनेते, आबा बागुल, वीरेंद्र किराड, नीता रजपूत, शानी नौशाद, अविनाश बागवे, लता राजगुरू, वैशाली मराठे, सुजाता शेट्टी, अरूण वाघमारे, कैलास गायकवाड, शखेर कपोते, मुख्तार शेख, राजेंद्र शिरसाट, सुरेखा खंडागळे, प्रविण करपे, सचिन आडेकर, सतीश पवार, रमेश सोनकांबळे, प्रदिप परदेशी, सुनिल घाडगे, अजित जाधव, विनय ढेरे, नुरूद्दीन सोमजी, विजय वारभुवन, दिपक ओव्‍हाळ, राहुल वंजारी, जयकुमार ठोंबरे, परवेज तांबोळी, सादिक कुरेशी, नितीन परतानी, राजू नाणेकर, गणेश शेडगे, भगवान कडू, राजेंद्र पेशने, वाल्मिक जगताप, राहुल तायडे, सुजित यादव, यासीन शेख, दयानंद अडागळे, रोहित अवचिते, दत्ता जाधव, हेमंत राजभोज, शाबिर खान, चेतन अगरवाल, रवि पाटोळे, भारत पवार, कान्होजी जेधे, अभिजीत रोकडे, डॉ. अनुप बेगी, रवि आरडे, बबलू कोळी व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0