Ramesh Bagwe : राष्ट्रवादीने भाजपच्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले  : कॉंग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे यांचा आरोप 

HomeBreaking Newsपुणे

Ramesh Bagwe : राष्ट्रवादीने भाजपच्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले  : कॉंग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे यांचा आरोप 

Ganesh Kumar Mule Nov 23, 2021 3:16 PM

MLC Election | जे २६ चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल
Arvind Shinde | pune congress | तुमचे फक्त ६ महिने मला द्या | स्वबळाचा नारा देत अरविंद शिंदेनी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जागवली ऊर्जा 
Chitrashrusthi | काँग्रेस पक्षाने देश उभारण्याचे काम अनेक वर्ष केलं परंतु गेली आठ वर्ष भाजपाने देश विकण्याचे काम केलं | नानाभाऊ पटोले

 राष्ट्रवादीने भाजपच्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले 

: कॉंग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे यांचा आरोप

पुणे : गेल्या महिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत स्मार्ट सिटीच्या १६० कोटी रूपयांचा ‘एटीएमएस’ प्रकल्पामध्ये महापालिकेमध्ये देखभाल दुरूस्तीचा खर्च उचलावा यासाठी पुढील ५ वर्षात ५८ कोटी रूपये देण्याचा प्रस्ताव आयत्यावेळी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने मंजूर करून घेतला. या प्रकल्पामुळे शहरातील सिग्नल व्यवस्था सुधारणार असल्याचा दावा भाजपने केला होता. या ५८ कोटी रूपयांचे काम भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याच्या संबंधित ठेकेदाराला मिळाले आहे. काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या बाबतीत सभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता आणि काँग्रेस पक्षाने या प्रकल्पाला विरोध केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही पत्रकार परिषद घेवून या प्रकल्पाला विरोध केला होता आणि आंदोलनही केले होते. मात्र राष्ट्रवादीने ऐन वेळेला पलटी खात भाजपच्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले असा आरोप कॉंग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी केला आहे. 

: महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आत्मपरीक्षण करावे

बागवे पुढे म्हणाले,  मुख्य सभेमध्ये सत्ताधारी भाजपाने उपसूचना देवून समाविष्ट गावातील १०० सिग्नलचा यामध्ये समावेश केला. हा विषय मंजूरीसाठी आल्यावर काँग्रेसच्या व शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध करीत स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी याची संपूर्ण माहिती द्यावी अशी मागणी केली. सदर प्रस्ताव महानगरपालिकेच्या अहिताचा आहे आणि पुणे शहरावर आर्थिक बोजा टाकणारा आहे. या प्रकल्पाची पुणे शहराला गरज नसताना स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुणे शहरावर आर्थिक भार लादणारा हा प्रस्ताव आहे आणि स्मार्ट सिटीने काढलेल्या निविदांची देखभाल दुरूस्ती पुणे मनपाने करावी असा हा पहिल्याच प्रकल्प आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शंका अनेक सामाजिक संस्थानी, संघटनांनी व पक्षांनी उपस्थित केली. काँग्रेस पक्षाची भूमिका सुरूवातीपासूनच या ठरावाला विरोधाची होती आणि म्हणून मुख्य सभेमध्ये काँग्रेस पक्षाने या विरूध्द आवाज उठविला आणि प्रस्तावाला प्रखर विरोध करून विरोधी मतदानही केले.‌ या उलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपशी हातमिळवणी करून प्रस्तावाच्या बाजूने मतदान कले. या आधी देखील अनेक विषयांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपासोबत मतदान करून अनेक प्रकल्पांना व भ्रष्ट पद्धतीने काढण्यात आलेल्या निविदांना मान्यता देवून पुणे मनपाला आर्थिक अडचणीत आणण्याचे काम केले आहे. ही गोष्ट पुणेकर भविष्यात नक्कीच लक्षात ठेवतील.

  बागवे म्हणाले, महाविकास आघाडीने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने गेल्या ५ वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचे ठरविले होते. असे असताना महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी ऐन वेळी घुमजाव करून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सहकार्य केले. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आघाडीचा धर्म न पाळता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मदत केली हे चिंताजनक आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आत्मपरीक्षण करावे. ज्या उद्देशाने महाविकास आघाडीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन करून भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम केले त्याच महाविकास आघाडीतील घटक पक्षाने पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मदत करून त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाला प्रोत्साहन दिले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: