‘The Karbhari’ Anniversary | Positive Journalism | सकारात्मक पत्रकारिता आणि समतोल बातम्या याचं दुसरं नाव म्हणजे “The कारभारी”! | तिसऱ्या वर्धापन दिनाच्या आमच्या वाचकांना मन:पूर्वक शुभेच्छा! 

HomeBreaking Newsपुणे

‘The Karbhari’ Anniversary | Positive Journalism | सकारात्मक पत्रकारिता आणि समतोल बातम्या याचं दुसरं नाव म्हणजे “The कारभारी”! | तिसऱ्या वर्धापन दिनाच्या आमच्या वाचकांना मन:पूर्वक शुभेच्छा! 

गणेश मुळे Aug 01, 2024 2:37 AM

Aurangabad High Court | घाणभत्ता वारस हक्काची सुनावणी पुढे ढकलली | आता 21 ऑगस्ट ला सुनावणी
MSRTC | एसटीच्या ताफ्यात येणार पाच हजार इलेक्ट्रिक आणि दोन हजार डिझेल बसगाड्या | एसटी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात वाढ
Primary Teachers | दुर्गम भागातील शिक्षकावरील अन्याय दूर करा  | महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाची मागणी 

‘The Karbhari’ Anniversary | Positive Journalism | सकारात्मक पत्रकारिता आणि समतोल बातम्या याचं दुसरं नाव म्हणजे “The कारभारी”!

| तिसऱ्या वर्धापन दिनाच्या आमच्या वाचकांना मन:पूर्वक शुभेच्छा!

      बघता बघता “The कारभारी” ही वृत्तसंस्था तीन वर्षांची झाली. वृत्तसंस्थेचं ४ थ्या वर्षात पदार्पण झालं. “The कारभारी” ही वृत्तसंस्था फक्त “आमची” नाही, ती आपली झालीय. हा आपलेपणा तुमच्यासारख्या चोखंदळ आणि रसिक वाचकांमुळे आला आहे. त्यामुळे सर्वात आधी तुम्हा वाचकांना तिसऱ्या वर्धापन दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
                सर्वसाधारणपणे बातम्या म्हटलं कि सनसनाटीपणा, नकारात्मकता, एककल्लीपणा, असा लोकांचा समज झाला आहे. असे होण्याला काही अंशी प्रसारमाध्यमे देखील जबाबदार आहेत. आणि हाच समज खोडून काढण्याचं काम आम्ही “The कारभारी” च्या माध्यमातून करतो आहोत. नकारात्मकता वाढीस लावण्याऐवजी आम्ही सकारात्मक पत्रकारितेची बीजे रोवतो आहोत. सनसनाटीपणा पेक्षा माहिती पुरवण्याचे काम आम्ही करतोय. कुठल्याही गोष्टीची एकच बाजू पाहण्यापेक्षा त्याचे सगळे पदर बातमीत आणण्याचा प्रयत्न करतोय. याच कारणामुळे आपण सकारात्मक पत्रकारिता जोपासून समतोल बातम्या देऊ लागलो आहोत. वाचकांच्या देखील ही गोष्ट ध्यानी येऊ लागली आहे. त्यामुळे वाचकांचा नेहमी सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळत राहतो.
              आम्ही बातम्यांच्या माध्यमातून सवंग मनोरंजन करत नाही. आम्ही आवश्यक ती माहिती लोकांपर्यंत पोचवतोय. लोक हुशार असतातच. त्यांना अजून शहाणे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुणे शहरातील नागरी प्रश्न, पुणे महापालिकेतील विविध प्रशासकीय माहिती, प्रकल्प, राज्यातील राजकीय घडामोडी याबाबत लोकांना आम्ही जागरूक करत असतो. शिवाय पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे प्रश्न आम्ही सातत्याने मांडत असतो. फक्त मांडतच नाही तर त्याचा योग्य रीतीने प्रशासनाकडे पाठपुरावा करुन प्रश्न मार्गी लावण्याचा देखील आपण प्रयत्न करतो. त्यात आम्हाला यश देखील येते. यामुळेच लोकांचा “The कारभारी” वरील विश्वास वृद्धिंगत होत चाललाय.
         याशिवाय आरोग्य, आर्थिक नियोजन, महत्त्वाची पुस्तके याविषयी आम्ही वाचकांना माहिती पुरवत असतो. लोकांनी त्यांचं आरोग्य जपले पाहिजे. स्वतःच एक आर्थिक नियोजन केलं पाहिजे. जेणेकरून त्यांना आर्थिक चणचण भासणार नाही. तसेच लोकांनी सतत आणि दररोज चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. याबाबत आम्ही नेहमी जागृती करण्याचा प्रयत्न करतो. याचाही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. याचमुळे आपण लाखो वाचकांचे प्रेम मिळवलं आहे. हे प्रेम, ही आस्था अशीच चिरंतन राहो. एवढीच या निमित्ताने माफक अपेक्षा.
मुख्य संपादक
The कारभारी.