भाजप आमदाराचा प्रस्ताव दोन महिने पुढे ढकलला
: स्थायी समितीत दिला होता प्रस्ताव
पुणे : शहरातील शिवाजी रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी 1 कोटी चे वर्गीकरण करावे, असा प्रस्ताव भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी मागील आठवड्यात झालेल्या स्थायी समिती समोर ठेवला होता. मात्र समितीने हा प्रस्ताव दोन महिने पुढे ढकलला आहे. आता यावर पुढील आर्थिक वर्षातच निर्णय होणार आहे. सत्ता हातात असूनही प्रस्ताव पुढे ढकलला जातो, याबाबत राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
: 1 कोटीचे वर्गीकरण देण्याचा प्रस्ताव
कसबा विधानसभा मतदार संघातील आणि प्रभाग 15 क मधील शिवाजी रस्त्याचे डांबरीकरण करावे, या कामासाठी 1 कोटीचे वर्गीकरण करावे, असा प्रस्ताव भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी स्थायी समिती समोर ठेवला होता. वर्गीकरणाच्या माध्यमातून ही रक्कम उपलब्ध करून देण्याची मागणी टिळक यांनी केली होती. अंदाजपत्रकात सारस बाग ते अप्पा बळवंत चौक उड्डाणपुल बांधण्यासाठी 1 कोटीची तरतुद करण्यात आली आहे. ही तरतूद या रस्त्यासाठी द्यावी, असे प्रस्तावात म्हटले होते. शिवाय मुख्य सभा मान्यता देईल, या भरवश्यावर आयुक्तानी या ठरावाची कार्यवाही करावी. असे ही यात नमूद केले होते. मात्र समितीने हा प्रस्ताव दोन महिने पुढे ढकलला आहे. आता यावर पुढील आर्थिक वर्षातच निर्णय होणार आहे. सत्ता हातात असूनही प्रस्ताव पुढे ढकलला जातो, याबाबत राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
COMMENTS