Medical College : वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरीत तांत्रिक अडचण ; महापौर दिल्लीत

HomeपुणेPMC

Medical College : वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरीत तांत्रिक अडचण ; महापौर दिल्लीत

Ganesh Kumar Mule Oct 28, 2021 3:33 PM

Har Ghar Tiranga | महापालिका खरेदी करणार 5 लाख तिरंगा ध्वज! | 85 लाखांचा येणार खर्च | मेडिकल कॉलेजच्या कामातून  वर्गीकरण केले जाणार 
PMC Recruitment Update | महापालिकेच्या मेडिकल कॉलेज साठी अध्यापक पदांची भरती 
Medical College of PMC : महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा! 

वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरीत तांत्रिक अडचण ; महापौर दिल्लीत

– महापौर मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

पुणे : महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरीत काही तांत्रिक निर्माण झाल्याचे एनएमसीचे म्हणणे होते. या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांची नवी दिल्लीतील आरोग्य मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ही भेट झाली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असून अंतिम मंजुरीसंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय होणार आहे.

लवकरच सुरु होणार महाविद्यालय

वैद्यकीय महाविद्यालयाने आजवर मंजुरीसंदर्भातील सर्व टप्पे पार केले असून प्राथमिक मंजुरी देण्यात आली आहे. मात्र अंतिम मंजुरीत काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी तातडीने भेट घेऊ तांत्रिक अडचण सोडवण्यासंदर्भातील नियोजन केंद्रीय आरोग्य मंत्री मांडवीय यांच्याकडे दिले. त्यावर मांडवीय यांनीही सकारात्मकता दाखवली आहे.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘अंतिम मंजुरीसाठी आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण केल्या असून सर्व वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठीची सर्व यंत्रणा सज्ज आहे. मात्र अंतिम मंजुरीत काही तांत्रिक मुद्दे उपस्थित झाल्याने त्याबाबत सविस्तर चर्चा केंद्रीय आरोग्य मंत्री मांडवीय यांच्याशी केली आहे. माझ्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात या संकल्पनेपासून तर अंतिम मंजुरीच्या टप्प्यापर्यंत देवेंद्र फडणवीस यांची मोलाची भूमिका राहिलेली आहे. त्याबद्दल त्यांचे पुणेकरांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो’.