Teachers Day | विविध क्षेत्रांतील संधी शोधण्याची क्षमता विकसित करायला हवी : सुनील नांदेडकर
Teachers Day | पुणे : जगभरात विविध क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत. या संधी शोधण्याची आणि त्यातून क्षमता विकसित करण्याची गरज आहे. जगभरात प्रचंड काम सुरू असून भारताकडे उद्योजकांचे लक्ष आहे” असे प्रतिपादन शिवमटेक इंजिनिअरिंग डिझाईन प्रा. लि. संचालक व युवा उद्योजक सुनील नांदेडकर (Sunil Nandedkar) यांनी केले. (Teachers Day)
शिक्षक दिनानिमित्त मराठवाडा मित्र मंडळाच्या व्यावसायिक अभ्यासक्रम विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव व उपप्राचार्य आर. आर. पंडित उपस्थित होते. “व्यवसाय म्हणजे संघर्ष, जो दिवस, महिना व वर्ष असा निमित्त नित्यच करावा लागतो. व्यावसायिकाला धाडसी निर्णय घ्यावे लागतात. कुटुंब हा व्यवसायिकाचा आधार असतो. कुटुंबाच्या सहकार्याशिवाय उद्योजक घडत नाही” असेही नांदेडकर यांनी प्रतिपादन केले. कार्याध्यक्ष जाधव सर यांनी शिक्षकांचे समाजातील महत्त्व वर्णन करताना सांगितलं “जो इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करतो तो शिक्षक असतो शिक्षक म्हणजे शिस्त क्षमता कार्यक्षमता याचा संगम असतो. शिक्षक हा सेवाभावी असल्याने आणि आजही समाजात मान्यता प्राप्त आहे” शिक्षक दिनाच्या निमित्ताने प्रातिनिधिक स्वरूपात सुभाष पत्की, उज्वल निरगुडकर, जयमाला पाटील, मिलिंद गुंजाळ, डॉ. समीर बोडस, शैलेंद्र वाघचौरे, डॉ. आदिनाथ भाकड प्रमोद मोरे, राकेश ठिगळे, मलसिद्ध कुंठाळे यांचा सत्कार करण्यात आला तर मिलिंद गुंजाळ व मलसिद्ध कुंठाळे यांनी मनोगत व्यक्त केले.