शहरात स्वाईन फ्लू वेगाने पसरतोय
| ऑगस्ट च्या पहिल्याच आठवड्यात १५९ positive रुग्ण
पुणे | शहरात कोरोना आटोक्यात आलेलें असताना काही दिवसापूर्वी डेंगू ने डोके वर काढले होते. मात्र आता स्वाईन फ्लू ने शहराला विळखा घातलेला दिसतो आहे. कारण मागील काही दिवसापासून शहरात स्वाईन फ्लू वेगाने पसरतो आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जुलै महिन्यापासून शहरात स्वाईन फ्लू वेगाने पसरताना दिसतो आहे. कारण जानेवारी ते मार्च पर्यंत शहरात स्वाईन चा एकही सक्रीय रुग्ण नव्हता. एप्रिल आणि मी महिन्यात एक एक रुग्ण सापडला. तर जून महिन्यात २ रुग्ण मिळाले. मात्र जुलै महिन्यात ११० रुग्ण मिळाले. तर याच महिन्यात ७ रुग्णांचा मृत्यू स्वाईन फ्लू ने झाला आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच ८ दिवसात १५९ सक्रीय रुग्ण मिळाले आहेत. तर आतापर्यंत ३ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून टेस्ट करून sample घेण्याचे काम सुरु आहे. जुलै महिन्यात ४३९ sample घेतले. तर ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत २२९ sample घेण्यात आले आहेत.