Swarget – Katraj Underground Metro | स्वारगेट – कात्रज भुयारी मेट्रो | बालाजी नगरला अतिरिक्त भुयारी स्टेशन | महापालिकेचे आर्थिक दायित्व नाही
Balajinagar Underground Métro Station – (The Karbhari News Service) – पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या (Pune Metro Rail Project) “स्वारगेट ते कात्रज” (टप्पा क्र. २) या वाढीव भुयारी मेट्रो मार्गीकेचे कामासाठी सुधारित आर्थिक सहभागासाठी मान्यता देण्यात आली आहे. सुधारित प्रकल्प नुसार या मार्गिकेत ४ भुयारी स्टेशन असणार आहेत, जे पूर्वी तीनच होते. बालाजीनगरचे अतिरिक्त भुयारी स्टेशन असणार आहे. मात्र याबाबत पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) कुठलेही आर्थिक दायित्व स्वीकारणार नाही. या बाबतचा प्रस्ताव तत्वतः मान्यतेसाठी स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (Pune Metro News)
पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या “स्वारगेट ते कात्रज” (टप्पा क्र. २) या वाढीव भुयारी मेट्रो मार्गीकेचे कामासाठी सुधारित आर्थिक सहभागासाठी मान्यता देण्यात आली आहे. ठरावान्वये “स्वारगेट ते कात्रज” (टप्पा क्र.२) या वाढीव भुयारी मेट्रो मार्गीकेचे काम करणेसाठी मालकीच्या जमिनीची किंमत व पुनर्वसन खर्चासहित २४८.६२ कोटी व पुणे महानगरपालिकेच्या आर्थिक सहभागापोटी एकूण प्रकल्प खर्चाच्या १५ % म्हणजेच रक्कम ४८५.२३ कोटी असा एकूण र.रु. ७३३.८५ कोटी केंद्र शासनाची अंतिम मान्यता मिळालेनंतर खर्च करणेस असे मान्य करण्यात आले आहे.
५.४६३ कि.मी. लांबी आणि ३ भुयारी स्टेशन असणारी स्वारगेट – कात्रज वाढीव भुयारी मेट्रो मार्गीकेसाठी एकूण प्रकल्प खर्चासाठी २९५४.५३ कोटी असून पुणे महानगरपालिकेचा आर्थिक सहभाग १८१.२१ कोटी असे मान्य करण्यात आली असून महा मेट्रो रेल कार्पोरेशन लि. यांच्या अन्वये राबविण्यात येणार आहे.
• स्वारगेट – कात्रज वाढीव भुयारी मेट्रो मार्गीकेमधील डी. पी. आर. अन्वये मेट्रो मार्गिकेची लांबी ५.४६३ कि.मी. लांबी आहे. डी. पी. आर. अन्वये मेट्रो मार्गीकेमधील ३ मेट्रो स्टेशन – मार्केट यार्ड, पद्मावती व कात्रज असे आहेत मात्र विविध लोकप्रतिनिधी मार्फत बालाजी नगर नजीक चौथे भुयारी स्टेशन करण्याची मागणी करण्यात आली होती.
तांत्रिक छाननी केली असता सद्य स्तिथीत दोन स्टेशन मधील सरासरी अंतर अंदाजे १.९ कि.मी. येत आहे. अतिरिक्त भुयारी स्टेशन बाबत विनंती पत्र प्राप्त होत आहेत. त्या अनुषंगाने महा मेट्रो विभागामार्फत मेट्रो मानांकनानुसार सदरचे अंतर हे १ टे १.५ कि.मी. असणे अपेक्षित आहे. त्यानुसार चौथ्या स्टेशन वाढीव भुयारी मेट्रो मार्गीकमधील अतिरिक्त स्टेशनसाठी तत्वतः मान्यता मिळणेस विनंती करण्यात आली होती.
त्यानुसार महापालिका आयुक्त यांनी सदर प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मान्यतेमध्ये नमूद असलेल्या सम भागापोटी ठरविण्यात आलेल्या खर्चाच्या दायित्वामध्ये कोणत्याही प्रकारे वाद होऊन महानगरपालिकेस आर्थिक तोषित लागणार नाही या अटीवर मेट्रो विभागाची मागणी मान्य करण्यास हरकत नाही. असे आदेश दिले होते.
सर्व बाबींचे अवलोकन करून महामेट्रो विभागास स्वारगेट – कात्रज वाढीव भुयारी मेट्रो मार्गीकेमधील बालाजी नगर येथील अतिरिक्त स्टेशनसाठी पुणे महानगरपालिकेस कोणतीही आर्थिक तोषिस लागू होणार नाही या अटीवर तत्वतः मान्यतेसाठी स्थायी समिती मार्फत मुख्य सभेची मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
COMMENTS