Swarget Bus Stand | स्वारगेट एसटी स्टँड परिसरातील रस्ता पदपथावरील अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई

Homeadministrative

Swarget Bus Stand | स्वारगेट एसटी स्टँड परिसरातील रस्ता पदपथावरील अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई

Ganesh Kumar Mule Feb 27, 2025 9:40 PM

PMC Encroachment Department | आपली बेवारस वाहने रस्त्यावरून हटवा | आजपासून केली जाणार जप्तीची कारवाई
 Action of Pune Municipal Corporation (PMC) on unauthorized building in Hill Top Hill Slope in Bibvewadi
Pune Corporation Encroachment Action | पुणे महापालिकेची पाषाण परिसरात जोरदार अतिक्रमण कारवाई | 3 लाख चौरस फुट बांधकाम पाडले

Swarget Bus Stand | स्वारगेट एसटी स्टँड परिसरातील रस्ता पदपथावरील अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई

 

PMC Encroachment Action – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय हद्दीमधील स्वारगेट एसटी स्टँड परिसरातील रस्ता पदपथावरील अनधिकृत अतिक्रमणांवर दि. 27/02/2025 रोजी अतिक्रमण विभागामार्फत  संदीप खलाटे, (उप आयुक्त, अतिक्रमण/अनाधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग), प्रदीप आव्हाड महापालिका सहाय्यक आयुक्त, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय यांचे नियंत्रणाखाली पुणे शहर पोलीस अंतर्गत स्वारगेट पोलीस स्टेशन यांचे समवेत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेने अतिक्रमण विभागामार्फत दिलेले परवाने व फेरीवाला प्रमाणपत्रामधील अटी शर्तीचा भंग करणारे व्यावसायिक यामध्ये स्वतः व्यवसाय न करणे, पोटभाडेकरू ठेवणे, मान्य जागेवर व्यवसाय न करणे, मान्य व्यवसाय न करणे, सिलेंडरचा वापर करणे इत्यादी प्रकारे अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. सदर कारवाईसाठी क्षेत्रिय अतिक्रमण निरीक्षक, अतिक्रमण निरिक्षक, सहाय्यक अतिक्रमण निरिक्षक, जेसीबी, बिगारी सेवक, पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस कर्मचारी यांचे समवेत कारवाई  पार पडली. अशी माहिती उपायुक्त संदीप खलाटे यांनी दिली.

तसेच अधिकृत फेरीवाले व्यवसायिकांना सद्यस्थितीत व्यवसाय बंद ठेवण्यास सांगण्यात आलेले आहे

खालीलप्रमाणे माल साहित्य जप्त करण्यात आले आहे.
तु.ला.काउंटर -०४
फळ पथारी -०२
रि. कॅरेट -०३
शेड -१४
ला. टेबल -०८
छोटा सिलेंडर -०१
लोखंडी काटा- ०१
ला. बांबू -१०
प्ला. पिंप -०१
ताडपत्री -०३
मिक्सर -०१
काचेचे ग्लास -१५

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: