Sunil Shinde on PMPML |  PMPML वरून काँग्रेसचे सुनील शिंदे मुख्य सभेत आक्रमक 

Homeadministrative

Sunil Shinde on PMPML |  PMPML वरून काँग्रेसचे सुनील शिंदे मुख्य सभेत आक्रमक 

Ganesh Kumar Mule Jul 24, 2026 8:34 PM

National Clean Air Programme | पुणे शहराला प्रदूषण मुक्‍त करण्यासाठी केंद्र सरकार सरसावले
PMC Pune Retired Employees | 31 मे ला पुणे महापालिकेचे 162 कर्मचारी सेवानिवृत्त
Dearness allowance |  महागाई भत्त्याची फाईल मोदी मंत्रिमंडळात पोहोचली | आता केव्हाही जाहीर होऊ शकते | जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट

Sunil Shinde on PMPML |  PMPML वरून काँग्रेसचे सुनील शिंदे मुख्य सभेत आक्रमक

“जबाबदार कोण? PMPML व्हेंटिलेटरवर गेली, राज्य सरकार बघ्याची भूमिका” – कामगारांचे प्रश्न, भरती घोटाळा, बससेवा सगळ्यावर हल्ला

 

Pune PMP – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत आज PMPML च्या कारभारावरून जोरदार खळबळ उडाली. काँग्रेसचे नगरसेवक आणि कामगार नेते सुनील शिंदे यांनी भाषणात PMPML मध्ये “700 ते 800 कोटींचा घोटाळा” झाल्याचा गंभीर आरोप केला. “तोटा म्हणजे घोटाळा आहे. एवढे पैसे देऊन गेले कुठे?” असा सवाल करत त्यांनी प्रशासन आणि राज्य सरकार दोघांनाही धारेवर धरले. (PMC GB Meeting)

“माझी नाळच परिवहनशी जोडली, म्हणून बोलतोय”
भाषणाची सुरुवात करताना शिंदे म्हणाले, “माझ्या आयुष्याची सुरुवातच परिवहन विभागातून झाली. ST महामंडळापासून मी यात आहे. PMPML ची जी संघटना आहे ती माझीच आहे. त्यामुळे या विषयावर बोलायला लागलो तर दिवस पुरणार नाही.”

मुख्य सभेने गेल्या 30 वर्षांपासून कामगारांना दिलेल्या मदतीबद्दल त्यांनी सभागृह आणि स्थायी समितीचे आभार मानले. “कामगारांचे प्रश्न आले की सभागृहाने नेहमी मदत करण्याची भूमिका घेतली,” असे ते म्हणाले.

“घोटाळा झाला, पण आरोपी कोण? – हाच मोठा प्रश्न”
शिंदे यांचा मुख्य हल्ला PMPML च्या आर्थिक स्थितीवर होता.

“गेल्या बऱ्याच दिवसापासून यावर चर्चा चालू आहे. सर्वजण एकमत आहेत की काहीतरी गडबड झाली, घोटाळा झाला. पण घोटाळा नक्की झाला, जबाबदार कोण हेच कळत नाही. जबाबदारी एकाही माणसावर fix नाही,” असा आरोप त्यांनी केला.

“आज सातशे कोटींचा घोटाळा, आठशे कोटींचा घोटाळा. गंमत चालली आहे. मी तोट्यालाच घोटाळा म्हणतो. कारण एवढे पैसे देऊन आमचे गेले कुठं? हा खरा प्रश्न आहे,” असे ते आक्रमकपणे म्हणाले.

“PMPML व्हेंटिलेटरवर, राज्य सरकार बघ्याची भूमिका”
PMPML ची बिकट अवस्था मांडताना शिंदे म्हणाले, “काही सभासद म्हणतात PMPML आजारी आहे, पाठीचा कणा मोडला.  यासाठी त्यांनी राज्य सरकारलाही जबाबदार धरले. “राज्य सरकार देखील बघायची भूमिका घेतंय,” अशी टीका केली.

शहरातील बिघडलेल्या बससेवेवरून त्यांनी प्रशासनाचा समाचार घेतला. “साधी bus सेवा तुम्ही त्यांना देऊ शकत नाही. रस्त्यावर traffic झालं म्हणून आपण आरडाओरडा करतो. bus सेवा जर व्यवस्थित असली तर कोणी खाजगी गाड्या घेतल्या नसत्या,” असे ते म्हणाले.

त्याचवेळी भरतीतील गैरप्रकार उघड करत त्यांनी “मुन्नाभाई” प्रकरणाचा उल्लेख केला. “दोन्ही पालिका आयुक्तांना डावलून PMP चा कोट्यवधींचा घोटाळा. typing परीक्षेत नापास, नववी पास लिपी पुन्हा शिपाई. मुन्नाभाईंचा कारभार काय चाललंय हे?” असा सवाल त्यांनी केला.

कामगार जबाबदार नाहीत – वेतन, फंड, वैद्यकीय सुविधा द्या
PMPML च्या तोट्याला कामगार जबाबदार आहेत का? या प्रश्नावर शिंदे म्हणाले, “बिलकुल नाही.” “वेतन मिळाले पाहिजेत, फंडाचे पैसे मिळाले पाहिजेत, वैद्यकीय योजना मिळाली पाहिजे. हे सगळे तोटे झाले. पण त्याला कामगार जबाबदार नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

शिंदे यांनी या विषयावर चांगले लेखन करणाऱ्या सर्व पत्रकारांचे आणि सभागृह नेत्यांचे आभार मानले. “आपण खूप चांगलं लिहिलं” असेही ते म्हणाले.

सुनील शिंदे यांनी केलेल्या “700-800 कोटी” घोटाळ्याच्या आरोपामुळे आणि “जबाबदारी fix नाही” या मुद्द्यामुळे महासभेत PMPML ची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी जोर धरण्याची शक्यता आहे. PMPML आधीच तोट्यात असताना आता आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप समोर आल्याने प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: