Sunil Shinde in PMC ESR | “Pune Climate and Environment Mission” स्थापन करा: सुनील शिंदे यांची मुख्य सभेत मागणी

HomeBreaking News

Sunil Shinde in PMC ESR | “Pune Climate and Environment Mission” स्थापन करा: सुनील शिंदे यांची मुख्य सभेत मागणी

Ganesh Kumar Mule Aug 18, 2026 7:22 PM

Aba Bagul Parvati Vidhansabha | ‘पर्वती’ साठी आबा बागुल यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल | पर्वती विधानसभा मतदारसंघातून लढत आता रंगतदार होणार
Aba Bagul Family | प्रत्येकाचा सन्मान हाच एकत्र कुटुंबाचा मूलमंत्र! – आबा बागुल
Pune News | पुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न | जनगणना  प्रक्रियेत  नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

Sunil Shinde in PMC ESR | “Pune Climate and Environment Mission” स्थापन करा: सुनील शिंदे यांची मुख्य सभेत मागणी

दरवर्षी 10 मोजता येणारी उद्दिष्टे आणि ESR Action Taken Report वर भर

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत पर्यावरण सद्यस्थिती अहवालावर चर्चा करताना काँग्रेस नगरसेवक सुनील शिंदे यांनी शहराच्या पर्यावरणीय समस्यांवर भाष्य करत ठोस उपाययोजना सुचवल्या. लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात मूलभूत सुविधा न मिळाल्याने पर्यावरणावर ताण येत असल्याचे सांगत त्यांनी “Pune Climate and Environment Mission” स्थापन करण्याची मागणी केली. (PMC Environmental Status Report)

शिंदे म्हणाले, पुण्याला नियोजित पाणीपुरवठा होत नाही. लोकसंख्या वाढत असताना रस्ते आणि मूलभूत सुविधा पुरेशा दिल्या जात नाहीत. त्यामुळे बांधकाम नियंत्रण, तलाव, माळे आणि नद्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे.

शहरातील भूजल पातळी खालावत असल्याने त्यासाठी स्वतंत्र धोरण आखावे. तसेच वृक्ष तोड थांबवून हरित क्षेत्र वाढवावे. बांधकाम कामगार आणि स्वच्छता कामगारांच्या आरोग्य, सुरक्षा आणि साधनांकडेही लक्ष देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

“Pune Climate and Environment Mission” ची संकल्पना

शिंदे यांनी सुचवले की, हवामान बदल आणि पर्यावरणीय आव्हाने लक्षात घेऊन महापालिकेने एक स्वतंत्र मिशन स्थापन करावे. या मिशनच्या माध्यमातून सर्व विभागांमध्ये समन्वय साधून दरवर्षी मोजता येणारी 10 उद्दिष्टे निश्चित करून त्यांची अंमलबजावणी करावी.

*मिशनमध्ये सहभागी असणारे विभाग:*
पाणी विभाग, घनकचरा विभाग, आरोग्य विभाग, वाहतूक विभाग, भवन विभाग, उद्यान विभाग, नदी संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन, PMRDA, PMPML आणि MahaMetro.

*प्रत्येक वर्षासाठीची 10 उद्दिष्टे:*
1. PM10 आणि PM2.5 मध्ये दरवर्षी निश्चित टक्केवारीने घट करणे
2. सर्व मोठ्या construction sites वर real-time dust monitoring करणे
3. 100 टक्के sewage treatment आणि treated wastewater चा वाढता पुनर्वापर करणे
4. प्रत्येक प्रभागात वर्षातून एकदा Green Audit करणे
5. प्रत्येक प्रभागासाठी Flood Risk Map तयार करणे
6. प्रत्येक वॉर्डसाठी Waste Reduction Target निश्चित करणे
7. PMPML + Metro integrated feeder network उभारणे
8. शाळा, रुग्णालये आणि PMC इमारतींमध्ये solar energy वाढवणे
9. प्रत्येक मोठ्या विकास प्रकल्पासाठी Climate Impact Assessment करणे
10. ESR मधील प्रत्येक शिफारसीसाठी “Action Taken Report” सादर करणे

“Action Taken Report” वर भर
“ESR Action Taken Report” ही सर्वात महत्त्वाची बाब असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पर्यावरण स्थिती अहवालात दिलेल्या शिफारसींची प्रत्यक्षात काय अंमलबजावणी झाली याचा लेखाजोखा दरवर्षी सादर करावा, जेणेकरून पारदर्शकता राहील आणि नागरिकांना विश्वास वाटेल.

महापालिका प्रशासनाने या प्रस्तावावर तातडीने विचार करून “Pune Climate and Environment Mission” स्थापन करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: