इंधन दरवाढी विरोधात युवा सेनेच्यावतीने राज्यव्यापी ‘सायकल रॅली’चे आयोजन
: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे करणार नेतृत्व
पुणे – इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. ऐन दिवाळीत सामान्य माणसाचे दिवाळे निघणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढी विरोधात युवासेनेकडून रविवारी (दि.31) राज्यव्यापी सायकल रॅली काढण्यात येणार आहे. याचे नेतृत्व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे करणार आहेत.
पुणे शहर युवा सेनेच्यावतीने इंधन दरवाढीचा सायकल रॅलीद्वारे तीव्र निषेध करण्यात येणार आहे. सारसबाग येथे सकाळी 10.30 वाजता या सायकल रॅलीला सुरुवात होणार आहे. सिलाई चौक, शनिपार, अप्पा बळवंत चौक येथून उजवीकडे वळून फरासखाना, दगडूशेठ मंदिर, समाधान चौक, पुन्हा उजवीकडे वळून लक्ष्मीरोड येथून खंडूजी बाबा चौक येथे रॅलीची समाप्ती होणार आहे.
संपूर्ण राज्यभरात युवा सेनेच्यावतीने ही सायकल रॅली आयोजित करण्यात येणार आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असल्याने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई ही वाढते आहे. त्यामुळे केंद्र सरकारला जागे करण्यासाठी ही सायकल रॅली काढण्यात येणार आहे.
या सायकल रॅलीमध्ये आपल्या न्यायासाठी विद्यार्थी, तरुण-तरुणीसह पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युवा सेनेने केले आहे.
COMMENTS