सणस ग्राउंड वर निर्माण होणार ऑलीम्पिक वॉल!
: 135 ऑलीम्पिक विजेत्या खेळाडूंची नावे कोरली जाणार
पुणे: महापालिकेच्या वतीने मनपाच्या मालकीच्या सणस मैदानावर ऑलीम्पिक वॉल उभारण्यात येणार आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
: स्थायी समितीची मान्यता
याबाबतचा प्रस्ताव सुरुवातीला क्रीडा समितीसमोर ठेवण्यात आला होता. समितीचे अध्यक्ष अजय खेडेकर यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. क्रीडा समितीची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला. प्रस्तावानुसार कै.बाबुराव सणस ग्राऊंड येथे असलेल्या म्युझियमच्या इमारती समोरील दर्शनी भिंतीवर अंतरराष्ट्रीय स्तरावरची “Olympic wall” करणेत यावी, भारतातील १३५ ऑलिंपिक पदक विजेते खेळाडू यांची नावे त्यावर कोरण्यास मान्यता द्यावी. अशी स्थायी समितीमार्फत मुख्य सभेकडे शिफारस आहे. स्थायी समितीने याला मंजुरी दिली आहे.
COMMENTS