Balewadi : पुण्यात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून १२ जण जखमी : ६ जणांची प्रकृती गंभीर

HomeपुणेBreaking News

Balewadi : पुण्यात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून १२ जण जखमी : ६ जणांची प्रकृती गंभीर

Ganesh Kumar Mule Oct 31, 2021 6:12 AM

PMC Pune News | बालेवाडीतील दसरा चौकात अनधिकृत बांधकामावर कारवाई | ३२,४५० चौ फूट बांधकाम हटवले
Public Relation Office of Chandrakant Patil | चंद्रकांतदादा पाटील यांच्या बाणेरमधील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
Water problem | Baner, Balewadi, Pashan, Soos, Mhalunge | बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगेचा पाणी प्रश्न तात्काळ सोडवा | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना

पुण्यात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून १२ जण जखमी

६ जणांची प्रकृती गंभीर

पुणे: निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून १२ जण जखमी झाल्याची घटना पुण्यातील बालेवाडी परिसरात घडली आहे. बालेवाडीमधील पाटील नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्लॅब इमारतीचा कोसळला. या दुर्घटनेत १२ जण जखमी झाले असून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वी १२ जणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. जखमी झालेल्या १२ जणांपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0