PMC Pune Employees Award | पुणे  महापालिकेच्या गुणवंत कामगार पुरस्काराचे लवकरच वितरण!   | मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर यांची माहिती

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune Employees Award | पुणे महापालिकेच्या गुणवंत कामगार पुरस्काराचे लवकरच वितरण! | मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर यांची माहिती

Ganesh Kumar Mule May 19, 2023 7:16 AM

MWRRA | PMC Pune | पुणे महापालिकेला वाढीव जल दराबाबत दिलासा नाही!   | MWRRA कडून महापालिकेची मागणी अमान्य 
7th Pay Commission | PMPML | पीएमपी कर्मचाऱ्यांना 100% सातवा वेतन आयोग लागू करा | पीएमटी इंटक संघटनेची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Chief Minister explanation | मंत्रीस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना नाहीत | मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण 

PMC Pune Employees Award | पुणे महापालिकेच्या गुणवंत कामगार पुरस्काराचे लवकरच वितरण!

| मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर यांची माहिती

PMC Pune Employees Award | (Author: Ganesh Mule) | कोरोना (corona) मुळे रखडलेल्या महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) गुणवंत कामगार पुरस्काराचे (Meritorious Employees award) लवकरच वितरण करण्यात येणार आहे. दोन वर्षांचे पुरस्कार एकदाच दिले जाणार आहेत. अशी माहिती महापालिकेचे मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर (PMC chief Labour Officer Shivaji Daundkar) यांनी दिली. (PMC Pune Employees award)

दरवर्षी दिले जातात पुरस्कार

महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना (PMC Pune employees and officers) प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महापालिकेच्या कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) वतीने गुणवंत कामगार पुरस्कार दिला जातो. दरवर्षी  वर्ग 1 ते वर्ग 4 मधील 20 कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. 25 हजार रुपये, प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. (PMC Pune News)

| कशाच्या आधारे दिले जातात पुरस्कार?

शिवाजी दौंडकर यांनी सांगितले कि गुणवंत कामगार पुरस्कार देताना विविध निकषांचा विचार केला जातो. यामध्ये खासकरून कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती देखील विचारात घेतली जाते. तसेच सेवाविषयक माहितीचा देखील विचार केला जातो. यामध्ये कर्मचाऱ्याने महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यात तसेच बचत करण्यात काय योगदान दिले, याबद्दलची माहिती विचारात घेतली जाते. दौंडकर यांनी पुढे सांगितले कि, कर्मचाऱ्यांची मागील 5 वर्षातील गोपनीय मूल्यमापन अहवालाची माहिती देखील घेतली जाते. तसेच कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमामधील सहभागाविषयी मते विचारात घेतली जातात. शैक्षणिक कार्याबद्दल कुठले पुरस्कार मिळाले आहेत का, याचा आढावा घेतला जातो. क्रीडा स्पर्धा मधील सहभाग आणि एखाद्या खेळामधील प्राविण्य देखील विचारात घेतले जाते. कर्मचाऱ्याने कुठले पुस्तक लिहून प्रकाशित केले आहे का, वर्तमानपत्र किंवा मासिकात काही लेख लिहिले आहेत का, हा देखील विचार केला जातो. अशा सर्व गोष्टीचा आढावा घेऊन मार्क दिले जातात. (Pune Mahanagarpalika News)

: मुलाखत कोण घेतात?

दौंडकर यांनी पुढे सांगितले कि याशिवाय कर्मचाऱ्यांची मुलाखत देखील घेतली जाते. यासाठी 5 ते 6 लोकांचे पॅनेल तयार करण्यात आले आहे. यामध्ये मुख्य कामगार अधिकारी, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील एक संचालक, पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापनातील एक अधिकारी, खाजगी कंपनीतील एक व्यक्ती आणि कामगार संघटनेतील एक पदाधिकारी यांचा समावेश असतो. (PMC Pune Marathi News)

कोरोनामुळे रखडले होते पुरस्कार

दौंडकर यांनी सांगितले कोरोना काळामुळे गुणवंत कामगार पुरस्कार देण्यात खंड पडला होता. मात्र आता पुन्हा याची सुरुवात करण्यात आली आहे. यावर्षी 2018-19 आणि 2019-20 अशा दोन वर्षाचे पुरस्कार दिले जाणार आहेत.  या महिन्याच्या शेवटी पुरस्कार देणे प्रस्तावित आहे. असे ही दौंडकर यांनी सांगितले. (Pune Municipal Corporation News)
——
News title | Soon distribution of meritorious workers award of the Pune municipal corporation (PMC)!  |  Information of Chief Labor Officer Shivaji Daundkar