Sinhgad Road Flyover | राजाराम पुल ते फन टाईम सिनेमागृह दरम्यान उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलास नरवीर तानाजी मालुसरे उड्डाणपुल नाव देण्याची मागणी
| शिवसेना नेते महेश पोकळे यांचे महापालिका आयुक्तांना स्मरणपत्र
Mahesh Pokale – (The Karbhari News Service) – राजाराम पुल (Rajaram Bridge) ते फन टाईम सिनेमागृह (Fun Time Theatre) दरम्यान उड्डाणपुल उभारण्यात आलेला असुन लवकरच नागरीकांसाठी तो खुला करण्यात येईल. या उड्डाणपुलास अद्यापपर्यंत कोणतेही नाव देण्यात आलेले नाही व उड्डाणपुलास नरवीर तानाजी मालुसरे असे नाव देण्यात यावे. अशी मागणी शिवसेना नेते महेश पोकळे (Mahesh Pokale Shivsena) यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. या आधी देखील पोकळे यांनी आयुक्त यांना याबाबत पत्र दिले होते. (Pune News)
पोकळे यांच्या निवेदन नुसार शालेय पुस्तकातुन तसेच सिनेमाच्या माध्यमातुन पुण्यातील सिंहगड किल्ल्याचा इतिहास परिचीत होत असतो. सिंहगडाची लढाई ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील महत्वाच्या घटनांपैकी एक घटना आहे. मुघलांशी तहात गमावलेले किल्ले परत घेण्यात छत्रपती शिवाजी महराजांनी मोहीमा आखल्या होत्या. त्या योजनेतच सिंहगड परत मिळवणे अतीशय महत्वाचे होते. सिंहगडावर झालेली ही लढाई नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानासाठी ओळखली जाते. नरवीर तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील सुभेदार व छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते. नरवीर तानाजी मालुसरे यांनी स्वराज्य स्थापनेपासुनच अनेक महत्वाच्या घडामोडीत सहभाग घेतला होता. नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास पुढील काळात येणाऱ्या पिढीला माहिती होण्यासाठी राजाराम पुल ते फनटाईम सिनेमागृह दरम्यान उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलास नरवीर तानाजी मालुसरे उड्डाणपुल असे नाव द्यावे. असे पोकळे यांनी म्हटले आहे.
COMMENTS