अरविंद शिंदे यांना संघटनेतील कामकाजाची माहिती नसल्याने पक्षाला कमकुवत करण्याची कृती बालिशपणाची | नरुद्दीन अली सोमजी
शहरातील सामाजिक, राजकीय आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले राजकीय गुन्हे सरसकट मागे घेण्याची मागणी कॉंग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्ते, नेते यांनी नुकतीच पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे. मात्र याबाबत काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आक्षेप घेतला होता. सरसकट गुन्हे माफ करण्याची भूमिका ही एका गटाची आहे. ती शहर काँग्रेसची भूमिका नाही. असे शिंदे यांनी म्हटले होते. यावर शिंदेची ही भूमिका आक्षेपार्ह आहे, असे कॉंग्रेस नेते नरुद्दीन अली सोमजी यांनी म्हटले आहे. अरविंद शिंदे यांना संघटनेतील कामकाजाची माहिती नसल्याने पक्षाला कमकुवत करण्याची त्यांची ही कृती बालिशपणाची आहे, असे देखील सोमजी यांनी म्हटले आहे.
सोमजी यांच्या निवेदनानुसार महाराष्ट्र सरकारने कोरोना काळातील दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश पोलिस खात्याला दिले आहे. त्यासाठी शासनाने GR काढले आहे,जनतेच्या हिताकरिता पोलिस खात्याने पडताळणी करुन गुन्हे मागे घ्यावे यासाठी कांग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ पुणे पोलिस आयुक्तांना भेटून निवेदन दिले.सरसकट राजकिय गुन्हे मागे घेऊ नये व महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी व रमेश बागवे यांचे पत्र अधिकृत मानू नये असे पत्र प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्तांना दिले आहे. या विषयाची माहिती नसताना केवळ कुरगोडी करण्यासाठी असे पत्र लिहून आयुक्तांची दिशाभूल करने हे त्या अध्यक्षपदाला शोभत नाही. मोहन जोशी आणि रमेश बागवे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहेत व शिष्टमंडळातील इतर सदस्य प्रदेशचे पदाधिकारी, नगरसेवक व प्रांतीक प्रतिनिधी आहेत. संघटनेच्या कामकाजाची महिती नसल्यामुळे बेजवाबदार वक्तव्य करुन ते वर्तमान पत्रात छापुन पक्षाला बदनाम करण्याचे काम शिंदे करत आहेत. कोरोना कालावधीतले राजकीय गुन्हे आणि इतर कालावधीतले राजकीय गुन्हे यातील फरक हा समजणे गरजेचे आहे. असे ही सोमजी यांनी म्हटले आहे.
—-
संघटनेतील कामकाजाची माहिती नसल्यामुळे पक्ष संघटना कुमकवत करणारी ही कृती पक्षाला धोकादायक आहे. यातून पक्षाच्या संघटन निर्माणाचे कार्य होण्यापेक्षाही पक्षांमध्ये फूट पाडण्याचे काम सुरू आहे. यातून काँग्रेस पक्ष कुमकुत करण्याची छुपी योजना तर नाही ना असा संशय येतो?
नरुद्दीन अली सोमजी, कॉंग्रेस नेते, पुणे शहर कॉंग्रेस