Shrinath Bhimale | पर्वती विधानसभा मतदारसंघात श्रीनाथ भिमाले आयोजित हजारो रिक्षा चालकांच्या उपस्थिती मध्ये मोफत गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न

Homecultural

Shrinath Bhimale | पर्वती विधानसभा मतदारसंघात श्रीनाथ भिमाले आयोजित हजारो रिक्षा चालकांच्या उपस्थिती मध्ये मोफत गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न

Ganesh Kumar Mule Sep 02, 2024 6:45 PM

MLA Madhuri Misal | नियाेजनबध्द विकासकामे केल्यानेच पर्वती मतदारसंघाचा सर्वांगीण विकास – आमदार माधुरी मिसाळ
Aba Bagul Parvati | ‘पर्वती फर्स्ट’ मुळे मतदारसंघाचा होणार कायापालट! | एकत्र येऊ,आपले प्रश्न आपणच सोडवू: आबा बागुल
Aba Bagul Parvati Vidhansabha | ‘पर्वती’ साठी आबा बागुल यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल | पर्वती विधानसभा मतदारसंघातून लढत आता रंगतदार होणार

Shrinath Bhimale | पर्वती विधानसभा मतदारसंघात श्रीनाथ भिमाले आयोजित हजारो रिक्षा चालकांच्या उपस्थिती मध्ये मोफत गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न

 

Shrinath Bhimale – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी तथा पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातील रिक्षाचालकांसाठी मोफत गणवेश वाटपाचा कार्यक्रम हजारो रिक्षा चालक बांधवांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. (Parvati Vidhansabha)

पर्वती विधानसभा मतदारसंघातील मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्व रिक्षा चालक बांधवांना गणवेश वाटप करण्यात आले.

“पुणे शहराची वाहतूक व्यवस्था हे शहराच्या प्रगतीचे चाक आहे. शहराची वेळ वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी जे कष्ट पीएमटी बस चालक, मेट्रो, लोकल या व्यवस्थेतील कर्मचारी घेतात तितकेच कष्ट पुणे शहरातील सर्वसामान्य रिक्षावाला देखील घेत असतो. पुणेकरांना वेळेवर आपल्या इच्छितस्थळी जाण्यासाठी रिक्षा ही नेहमी जवळचे आपुलकीचे साधन राहिले आहेत. पुण्यनगरीची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या रिक्षावाल्यांना एक सन्मानाची वर्दी देण्याचा अभिनव उपक्रम आपण राबवत आहोत. या रिक्षा चालक बांधवांच्या अनेक अडी-अडचणी आहेत. बाहेरून आलेल्या ओला उबर सारख्या कंपन्या या रिक्षा चालकांच्या व्यवसायामध्ये स्पर्धा निर्माण करत असताना देखील हा सर्वसामान्य रिक्षावाला प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत आहे. या रिक्षा चालक बांधवांसाठी पेन्शन व इतर अन्य शासकीय सोयी सुविधा मिळणे देखील आवश्यक आहे. निश्चितच या सर्व अडचणी सोडविण्यासाठी आपण शासन दरबारी देखील प्रयत्न करत आहोत.या गणवेश वाटप उपक्रमाद्वारे आपण रिक्षा चालक बांधवांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहोत”, असे मत यावेळी पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी तथा पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी आमदार सुनील भाऊ कांबळे, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0