Parvati Vidhansabha Election | ‘पर्वती’ साठी काँग्रेस कार्यकर्ते एकवटले! | उमेदवारी कुणालाही मिळू द्या, एकदिलाने काम करण्याचा निर्धार

HomeBreaking Newsपुणे

Parvati Vidhansabha Election | ‘पर्वती’ साठी काँग्रेस कार्यकर्ते एकवटले! | उमेदवारी कुणालाही मिळू द्या, एकदिलाने काम करण्याचा निर्धार

गणेश मुळे Jul 12, 2024 6:06 AM

The time and date of voting should be printed on the VVPAT slip of the EVM machine  | Hearing on the writ petition filed in the Supreme Court tomorrow
Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | पुणे लोकसभेसाठी काँग्रेस च्या इच्छुकांना अर्ज करण्यासाठी उद्या पर्यंतची मुदत!
EVM Machine VVPAT Slip | ‘ईव्हीएम मशीनच्या व्हीव्हीपॅट स्लिपवर मतदानाची वेळ,दिनांक छापली जावी | सर्वोच्च न्यायालयात दाखल रिट याचिकेवर उद्या सुनावणी 

Parvati Vidhansabha Election | ‘पर्वती ‘ साठी काँग्रेस कार्यकर्ते एकवटले! | उमेदवारी कुणालाही मिळू द्या,एकदिलाने काम करण्याचा निर्धार

 

Parvati Vidhansabha Election – (The Karbhari News Service) – उमेदवारी कुणालाही मिळू द्या, आम्ही एकदिलाने काम करू असा निर्धार व्यक्त करताना यंदा पर्वती विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षालाच मिळाला पाहिजे. अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी केली आहे. (Pune Congress)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व उपमहापौर आबा बागुल (Aba Bagul Pune Congress)  यांच्या पुढाकारातून काँग्रेस कार्यकर्ता – पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अडीचशेहून अधिक कार्यकर्त्यांनी यंदा पर्वती विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसलाच मिळावा यासाठी एकीचे दर्शन घडवले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड (Abhay Chajed Pune congress), प्रदेशच्या महिला अध्यक्षा व पुण्याच्या माजी महापौर कमल व्यवहारे, स्नेहल पाडळे,युवक काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष सौरभ अमराळे, घन:श्याम सावंत,नंदकुमार बानगुडे, हेमंत बागुल आणि पर्वती ब्लॉक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, सिंहगड रस्ता परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी येत्या विधानसभा निवडणुकीत पर्वती विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसलाच मिळाला पाहिजे यासाठी लवकरच शिष्टमंडळासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेवून या मतदारसंघाच्या मागणीवर ठाम राहण्याचेही यावेळी ठरले.

यावेळी या मतदारसंघातून निवडणुकीसाठी तीव्र इच्छुक असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल यांनी यंदा मी निवडणूक लढणारच हे यावेळी जाहीर करताच उपस्थितांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले की, पर्वती विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि आजही येथे काँग्रेस विचारधारेला मानणारे मतदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळाला पाहिजे. ही सर्वांची आग्रही मागणी आहे. त्यासाठी उमेदवारी कोणालाही मिळाली तरी चालेल मात्र सर्वजण एक दिलाने काम निश्चित करणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.