Shivsena UBT Pune | दुकानांवरील मराठी पाट्या विषयात शिवसेना (उ बा ठा) पुणे आक्रमक
Marathi Bhasha Gaurav Din – (The Karbhari News Service) – मराठी भाषेसाठी, मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्रात अनेक आंदोलने झाली, तरी आजही पुण्यात टिळक रोड व इतर भागात अनेक दुकानदारांच्या नावाच्या पाट्या इंग्रजीत आहेत. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुणे शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने यावर आंदोलन करण्यात आले. (Pune News)
यावेळी दुकानदरांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देऊन पुढील पंधरा दिवसांत सर्व दुकानांच्या पाट्या मराठी भाषेतून करण्याचे तसेच सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन घेण्यात आले अन्यथा मराठी भाषेच्या सन्मानार्थ, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शिवसेना पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असे कळविण्यात आले .
यावेळी आंदोलनाचे आयोजक शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी बोलताना सांगितले की शिवसेनेचा जन्मच मुळात मराठी भाषा ,मराठी माणूस यांच्यासाठी झाला आहे, त्यामुळे मराठीचा अवमान महाराष्ट्रात आम्ही कदापी सहन करणार नाही, दुकानांवर मराठी पाटी विषयात माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारने तसेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार पाट्या लागल्याच पाहिजे अन्यथा शिवसेना आक्रमकपणे सदर विषयात रस्त्यावर उतरेल.
यावेळी आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण, सूरज लोखंडे, राजेश मोरे, नितीन परदेशी, युवासेना शहर संघटक राम थरकुडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, किशोर राजपूत, संदीप गायकवाड, पराग थोरात, मकरंद पेठकर, महिला आघाडीच्या निकिता मारतकर, वैशाली दारवटकर, अमृता पठारे, दिपाली राऊत, राणी इनामदार, शिवसेना पदाधिकारी संतोष भुतकर, राकेश बोराटे, दिलीप पोमण, अमर मारतकर, जुबेर तांबोळी, गणेश घोलप, रमेश लडकत, प्रतीक गालिंदे, नागेश खडके, संजय साळवी, नितीन दलभंजन, मुकेश दळवे, निलेश वाघमारे, गणेश वायाळ, जुबेर शेख, किरण शिंदे, जगदीश परदेशी, तुषार भोकरे, शिवाजी मेनकरी, अमित बाबर व शिवसैनिक उपस्थित होते.
COMMENTS