Shivsena (UBT) Pune | पुण्यातील माजी नगरसेवक सह भाजप, राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिवसेनेत!
Pune Politics – (The Karbhari News Service) – पुणे मनपाचे माजी नगरसेवक सुनील गोगले यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हस्ते शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षात प्रवेश केला. (Pune News)
तसेच भाजप माथाडी पुणे शहर उपाध्यक्ष अक्षय भोसले, छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक, मातंग आघाडीच्या आरती मिसाळ, क्रांतिवीर झोपडपट्टी संघटना संस्थापक अध्यक्ष राजेश परदेशी, राष्ट्रवादी युवकचे श्रवण केकाण या सर्वांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रसंगी संपर्कप्रमुख सचिन अहिर, निवडणूक समन्वयक वसंत मोरे, पुणे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख आबा निकम, विभाग प्रमुख राहुल जेकटे, अजय परदेशी, सोमनाथ गायकवाड, शशिकांत साठोटे, रेवण सूळ, विकी धोत्रे उपस्थित होते.

COMMENTS