Shivsena UBT on PMC Election | शिवसेनेने फुंकले महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग! | दत्त जयंतीच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज वाटपाची सुरुवात

Homeadministrative

Shivsena UBT on PMC Election | शिवसेनेने फुंकले महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग! | दत्त जयंतीच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज वाटपाची सुरुवात

Ganesh Kumar Mule Dec 04, 2025 8:23 PM

PMC Sky Sign Policy | जाहिरात शुल्क सुधारित करण्याबाबतचे दोन प्रस्ताव प्रशासनाने घेतले मागे | प्रशासन बॅकफूटवर तर होर्डिंग धारकांना दिलासा 
Sandeep Khardekar | महाविकास आघाडीने राज्यात अराजक सदृश परिस्थिती निर्माण न करता उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे | भाजपा प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांचे आवाहन
Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी (१७ एप्रिल) रोजी शहरातील या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

Shivsena UBT on PMC Election | शिवसेनेने फुंकले महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग! | दत्त जयंतीच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज वाटपाची सुरुवात

 

PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (UBT)  मैदानात उतरली आहे. दत्त जयंतीचा मुहूर्त साधत आज पत्रकार भवन येथे प्रतीकात्मक स्वरूपात २ महिला आणि २ पुरुष इच्छुकांना उमेदवारी अर्ज देण्यात आले आणि एकप्रकारे निवडणुकीची औपचारिक सुरूवात झाली. (Pune News)

 

उमेदवारी अर्ज वाटप

4 डिसेंबर 2025 पासून पुढील 7 दिवस शिवसेना पुणे शहर कार्यालय, डेक्कन जिमखाना, पुणे येथे दुपारी 3 ते सायं 6 वेळेत अर्ज उपलब्ध होणार आहेत.

अर्ज किंमत ₹500 असून अर्ज दाखल करतानाचे शुल्क : ₹10,000 सर्वांसाठी असणार आहे.

उमेदवारी अर्जात इच्छुकांचे शिक्षण, सामाजिक काम, शैक्षणिक योगदान, पक्षाच्या आंदोलनातील सहभाग, बैठकींतील उपस्थिती, प्रभागातील उपक्रम अशी सविस्तर माहिती आवश्यक आहे. अर्ज प्राप्तीनंतर सात दिवसांनी मुलाखतींची प्रक्रिया सुरू होणार आहे.

पत्रकार परिषदेत युतीबाबत शिवसेनेची भूमिका मांडताना संजय मोरे म्हणाले, महाविकास आघाडी किंवा युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावर होईल. पुणे शहर शिवसेना मिळालेल्या आदेशाचे पालन करेल, भाजपने भूतकाळात शिवसेनेसोबतची युती तुटवून विश्वासघात केला असल्याने, शिवसेना पुणे शहर पूर्ण तयारीत असून युती असो वा नसो, लढण्यासाठी आम्ही सर्व ताकदीने तयार आहे. महाविकास आघाडी झाल्यासही निवडणूक मजबूतपणे एकत्रित लढवली जाईल.

यावेळी कार्यक्रमास वसंत मोरे – निवडणूक समन्वयक, संजय मोरे पुणे शहरप्रमुख, गजानन थरकुडे, अनंत घरत प्रसिद्धी प्रमुख, पुणे उपस्थित होते.

शिवसेनेच्या नेतृत्वाखालील पुणे शहर आता निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करीत असून महानगरपालिकेत पुन्हा एकदा जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेना सज्ज आहे! असे मत गजानन थरकुडे यांनी व्यक्त केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: