Shivsena UBT – MNS – Congress Manifesto | ‘शब्द ठाकरेंचा’ पुण्याच्या विकासाचा  ! | शिवसेना, मनसे आणि काँग्रेसचा वचननामा प्रसिद्ध | पुणे महापालिकेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी यंत्रणा उभारणार

शिवसेना, मनसे आणि काँग्रेसचा वचननामा आज शुक्रवार रोजी मनसेच्या कार्यालयामध्ये प्रसिद्ध केला. यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, साईनाथ बाबर, बाबू वागसकर, प्रशांत बधे, बाळा शेडगे, प्रशांत कनोजिया, नरेंद्र तांबोळी हे उपस्थित होते.

HomeBreaking News

Shivsena UBT – MNS – Congress Manifesto | ‘शब्द ठाकरेंचा’ पुण्याच्या विकासाचा  ! | शिवसेना, मनसे आणि काँग्रेसचा वचननामा प्रसिद्ध | पुणे महापालिकेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी यंत्रणा उभारणार

Ganesh Kumar Mule Jan 09, 2026 7:18 PM

Aditya Thackeray visited Vetal Tekadi |  PMC pune has laid the foundation to destroy Vetal Hill  |  Aditya Thackeray’s allegation
Raj Thackeray | अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप; राज ठाकरेंचा रोख कुणाकडे? | मुख्यमंत्री, संजय राऊत, आदित्य ठाकरे बद्दल काय म्हणाले राज ठाकरे? 
Aditya Thackeray : आदित्य ठाकरे घेणार शिवसेना नेत्यांची बैठक  : पुणे महापालिका निवडणुकीची तयारी 

Shivsena UBT – MNS – Congress Manifesto | ‘शब्द ठाकरेंचा’ पुण्याच्या विकासाचा  ! | शिवसेना, मनसे आणि काँग्रेसचा वचननामा प्रसिद्ध | पुणे महापालिकेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी यंत्रणा उभारणार

 

PMC Election – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना, मनसे आणि काँग्रेसचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात आदित्य आणि अमित ठाकरे यांचा पुढाकार दिसून येत आहे. पुण्यावर होणारे हे बेछूट आघात थांबवायचे असतील तर भाजपला रोखावेच लागेल. पुण्याला लुटून खाल्ल्याची शेकडो प्रकरणे पुणेकरांनी पाहिलेली आहेत. आता ती लूट रोखण्याची वेळ आलेली आहे. महाराष्ट्र हिताचा पुण्याच्या विकासाचा विचार करणारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा वचननामा देताना आम्ही हाच विश्वास देतो की, ‘शब्द ठाकरेंचा’ हाच पुण्याचा विकास ! असे या दोघांनी वचननाम्यात म्हटले आहे. (Pune News)

आदित्य आणि अमित ठाकरे यांनी या माध्यमातून म्हटले आहे कि,  पुण्यासाठी पुणेकरांच्या हक्काचा वचननामा देताना स्थानिक नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि सोयी-सुविधांचा विचारच नजरेसमोर ठेवलेला आहे. शहराच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवताना आपली सांस्कृतिक वीण अधिकाधिक घट्ट ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. माझे आजोबा  हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्यात झालेला आहे. एखाद्या शहराशी इतकं मोठं जिव्हाळयाचं नातं यापेक्षा दुसरं कुठलं असूच शकत नाही.

मी पुण्यात कित्येकवेळा राहिलेलो आहे. परंतु ते पुणे आता कुठेतरी हरवत चाललेलं आहे. याचं वाईट वाटतं. शहराचा विकास होताना स्थानिक नागरिकांना वेदना होता कामा नये. हीच आमची भूमिका आहे. शहराचा आराखडा बनविताना त्या शहरावर ओरखडे ओढले जात असतील तर ते कदापिही सहन केले जाणार नाही. मुळात जिथे जिथे भाजपची सत्ता आहे तिथे शहराचे वाटोळे होत चाललेले आहे. शहराच्या जमिनी, साधनसंपत्ती गिळण्याचे काम भाजप करत आहे.  केंद्रात, राज्यात आणि महानगरपालिकेत एकहाती सत्ता असतानाही भाजपने पुण्याचे जे वाटोळे करून ठेवलेय ते अनुभवत आहोतच. विकासाच्या नावाखाली पुणेकरांच्या करातून आलेल्या पैश्याची खुलेआम लूट भाजप करीत आहे. नको असलेले प्रकल्प पुणेकरांच्या माथ्यावर लादत आहेत. मुळा-मुठा नदीचे सुशोभिकरण करण्याच्या नादात पर्यावरणाचे मोठे नुकसान केले जात आहे. रस्ते, बोगदे करण्याच्या नावाखाली टेकड्या उद्धवस्त करण्याचे कारस्थान आखले जात आहे. एकेकाळी सुरक्षित, शांत असलेले पुणे कधी नव्हे इतके गुन्हेगारीचे थैमान पहात आहे. असे या दोघानी वचननाम्यात म्हटले आहे.

काय आहे वचननामा

वाहतूक समस्या
नवीन रस्त्यांची निर्मिती करणार.
• नवीन उड्डाण पुलांची निर्मिती करणार.
• ७ × १२ सिग्नल यंत्रणा उभारून वाहतूकीस शिस्त लावणार. • नवीन प्रशस्त वाहतूकतळांची निर्मिती करणार.
• वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी १००० पेक्षा जास्त वॉर्डनची नेमणूक करून पुणे शहर वाहतूक कोंडी मुक्त करणार.

रस्ते
• उच्च तंत्रज्ञान वापरून भक्कम रस्त्यांची बांधणी करणार.
जो ठेकेदार रस्ता बांधणीचे काम करेल त्याच ठेकेदारास पुढील
पाच वर्षे रस्ता देखभाल अनिवार्य करणार.
पुण्यातील रस्ते खड्डेमुक्त करणार.
१९८७ पासून च्या डी पी मध्ये दाखविलेल्या परंतु एक इंचही प्रगती न झालेल्या एच पी एम आर टी प्रकल्पावर पुनर्विचार करणार.

आरोग्य
• प्रत्येक क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत आधुनिक सुसज्ज रुग्णालयांची निर्मिती करणार.

• पिवळ्या, केशरी शिधा पत्रिका धारक नागरिकांना वैद्यकीय सेवा व औषधे मोफत उपलब्ध करून देणार.

पाणी
पुण्याला मिळणारा पाण्याचा कोटा वाढवून आणणार.
· पुणे शहरात चोवीस तास मुबलक समान पाणी पुरवठा करणार.
मुळशी धरणाचे पाणी आणणार.
पाणी गळती थांबवणार.

पी.एम.पी.एल.
• सर्व बसेस सुस्थितीत व स्वच्छ ठेवण्यावर भर देणार.
• सर्व प्रवाशांना माफक दरात प्रवास उपलब्ध करून देणार. प्रत्येक ५ किलोमीटर साठी रुपये ५ प्रमाणे भाडे आकारणार.
शालेय व कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ५०% सवलतीच्या दरात प्रवास उपलब्ध करून देणार. • स्वच्छ, सुंदर बस स्थानकांची निर्मिती करणार.
· पी.एम.पी.एल.ची आर्थिक तूट दूर करणार.

भ्रष्टाचार
· महापालिकेतील कारभार जलद पारदर्शी व भ्रष्टाचार मुक्त करणार.
भ्रष्टाचार रोखण्यासाठी यंत्रणा उभारणार.
झालेल्या व न झालेल्या कामांचे ऑडिट करणार.

महिला
• महिलांसाठी मोफत पी. एम.पी.एल. बस प्रवास.
• घरकाम करणाऱ्या महिलांसाठी विमासंरक्षण व पेन्शन योजना सुरु करणार.
· महिलांसाठी रोजगार प्रशिक्षण केंद्र उभारणार.
एकल महिलांसाठी महिला वसतिगृहांची उभारणी करणार.

युवक
· युवकांना रोजगार देणार, त्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणार.
• भूमिपुत्रांना सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी, अधिकारी या पदांवर नेमणूक करण्यसाठी प्राधान्य देणार.

जेष्ठ नागरिक
· जेष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क, विरंगुळा केंद्र उभारणार. • मोफत औषध सुविधा देणार.
पी.एम.पी.एल बस पास पूर्णतः मोफत देणार.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0