Shivsena Pune | कॅम्प परिसरातील समाजविघातक कृत्यावर पुणे शिवसेनेचा तीव्र निषेध
| नसीम शेख अब्दुल्ला यांना तात्काळ अटक करा- प्रमोद नाना भानगिरे
Pramod Nana Bhangire – (The Karbhari News Service) – संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्या पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करत असतांना, कॅम्प परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एक गंभीर आणि समाजविघातक प्रकार घडला. नसीम शेख अब्दुल्ला या महिलेने वारकऱ्यांच्या दिशेने मांसाचे तुकडे व हाडके फेकून जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या कृत्यामुळे वारकऱ्यांमध्ये संताप, भीती आणि अस्वस्थता पसरली. ही कृती केवळ भावनांना ठेस पोहोचवणारी नव्हे, तर हिंदू समाजाच्या श्रद्धेवर थेट आघात करणारी, हेतुपुरस्सर घडवलेली कारवाई आहे. (Aashadhi Wari 2025)
या प्रकारावर आज शिवसेना पुणे शहरच्या वतीने पोलीस आयुक्तालयात निवेदन देण्यात आले. शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, “ही घटना कोणत्याही अपघातामुळे घडलेली नसून, महाराष्ट्राच्या संतपरंपरेवर जाणीवपूर्वक केलेला हल्ला आहे. नसीम शेख अब्दुल्ला हिला तात्काळ अटक झाली नाही, तर शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल. हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणाऱ्या समाजविघातक कृत्यांना कोणत्याही परिस्थितीत आळा घातलाच गेला पाहिजे.”
नसीम शेख अब्दुल्ला यांच्यावर IPC कलम १५३A, २९५A, ५०५ आणि अन्य लागू असलेल्या गंभीर कलमांतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी तसेच या कृत्यामागे कोणत्या प्रवृत्ती, व्यक्ती किंवा संघटना कार्यरत होत्या, याचा सखोल तपास करून संपूर्ण कटाची उकल करावी, वारकऱ्यांच्या तसेच सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची खात्री द्यावी,हिंदू धर्मीयांच्या श्रद्धेला लक्ष्य करणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तींच्या घटनांवर कठोर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने भविष्यात ठोस उपाययोजना कराव्यात.
शिवसेनेचे स्पष्ट मत आहे की, धार्मिक सहिष्णुतेच्या भूमीवर समाजात जाणीवपूर्वक फूट पाडण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्मीयांची आस्था ही महाराष्ट्राची ओळख आहे, आणि ती डगमगू देणे कोणालाही शक्य नाही.
जर प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलली नाहीत, तर शिवसेना आपल्या परंपरेनुसार जनतेसोबत उभे राहत व्यापक आंदोलन उभारण्यास मागेपुढे पाहणार नाही.
COMMENTS