Shivsena Pune | पुण्यातील पुरामुळे नुकसानग्रस्त कुटुंबांना शिवसेनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
Pramod Nana Bhangire – (The Karbhari News Service) – पुण्यातील पूरग्रस्त भागांची व नागरिकांच्या घरांची स्वच्छता केल्यानंतर आता शिवसेनेतर्फे नुकसानग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. शहरातील विविध पूरग्रस्त भागांतील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुणेकर नागरिकांवर अचानक ओढवलेल्या या संकटात मदत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून शिवसेनेच्या वतीने शहरातील नुकसानग्रस्त कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचे अभियान राबविण्यात आले. (Pune News)
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे व पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने 28 जुलै रोजी पुण्यातील नवले ब्रिज नजीक असलेल्या नवले आयकॉन बिल्डिंग येथे नुकसानग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य, ऊबदार कपडे व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किटच्या पुरवठ्याचे अभियान देखील राबविण्यात आले. मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानामुळे नागरिकांनी अचानक आलेल्या संकटातून सावरण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतर्फे हे अभियान पुणेकरांसाठी राबविण्यात आले आहे असे प्रमोद भानगिरे यांनी यावेळी मध्यमांशी बोलताना सांगितले.
पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाची यंत्रणा ही शहरातील पूरस्थितीचे निवारण करण्यासाठी व पूरग्रस्तांना मदत पुरवण्यासाठी अविरत परिश्रम घेत असून या मदत कार्यात शहरातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे, युवासेना शहरप्रमुख निलेश गिरमे,सुधीर कुरुमकर,श्रुती नाझिरकर, नितीन लगस, कौस्तुभ कुलकर्णी व शिवसैनिक यांचा देखील सहभाग आहे.