Shivneri Shree | महाराष्ट्र राज्यस्तरीय शिवनेरी श्री 2024 चा मानकरी ठरला मुंबईचा शशांक वाकडे

HomeBreaking News

Shivneri Shree | महाराष्ट्र राज्यस्तरीय शिवनेरी श्री 2024 चा मानकरी ठरला मुंबईचा शशांक वाकडे

Ganesh Kumar Mule Dec 31, 2024 12:43 PM

Pune PMC Encroachment Action | वारजे येथील मुंबई बेंगलोर हायवे येथे फळ विक्रेत्यांवर धडक कारवाई
National Senior Body Building Competition | 16व्या नॅशनल सीनियर बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी पुण्याच्या ओंकार नलावडे व शितल वाडेकरची निवड
Warje Ward Office | वारजे येथील गणपती माथा ते शिंदे पूल दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका

Shivneri Shree | महाराष्ट्र राज्यस्तरीय शिवनेरी श्री 2024 चा मानकरी ठरला मुंबईचा शशांक वाकडे

 

Shivneri Shree 2024 – (The Karbhari News Service) – शिवनेरी फिटनेस, जुन्नरच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी महाराष्ट्र राज्यस्तरीय आयोजित महाराष्ट्र शिवनेरी श्री 2024 ही स्पर्धा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडली.

स्पर्धेचे आयोजन महेश शेटे, जितेश शेटे या बंधूंनी व महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या संलग्न संघटनांची मिळून केले होते. अतिशय अतितटीच्या सामन्यात महाराष्ट्र शिवनेरी श्री 2024 चा मानकरी मुंबईचा शशांक वाकडे ठरला, तर महिला गटातून पुण्याच्या शितल वाडेकर यांनी गोल्ड मेडल जिंकले. या स्पर्धेतील बेस्ट पोजरचा मानकरी विनायक लोखंडे, मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डरचा मानकरी पंचाक्षरी लोणारे आणि अपकमिंग बॉडी बिल्डरचा मानकरी पुण्याचा ओमकार नलावडे ठरला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या या पावनभूमीमध्ये महाराष्ट्रातून 300 स्पर्धकांनी हजेरी लावली.
महाराष्ट्रातून आलेल्या महिला खेळाडू या स्पर्धेतील प्रमुख आकर्षण ठरल्या.

कार्यक्रमास सत्यशील शेरकर जुन्नर ह्याठिकाणी उपस्थित राहिले. यावेळी या पावन भूमीमध्ये महाराष्ट्रातून आलेल्या सर्व स्पर्धकांचे त्यांनी स्वागत व अभिनंदन केले. व्यसनापासून तरुण पिढीने दूर राहून फिटनेस कडे लक्ष द्यावे, असे सुचवले.

या प्रसंगी महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सेक्रेटरी मा श्री राजेंद्र चव्हाण, खजिनदार श्री अजय गोळे, उपाध्यक्ष शरद मारणे, गोपाळ गायकवाड, राजेश वडाम, हेमंत खेबडे, मयूर दरंदले, मंदार अगवनकर, कुतुब सय्यद,
महेश शेटे, जितेश शेटे व आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
महाराष्ट्र राज्यस्तरीय शिवनेरी श्री २०२४
*शरीरशौष्ठव स्पर्धेचा निकाल*

वुमन क्लासिक
पहिला क्रमांक शितल वाडेकर, पुणे
दुसरा क्रमांक अपूर्वा पालवे, ठाणे
तिसरा क्रमांक प्रतीक्षा जैन , ठाणे
चौथा क्रमांक केतकी निलिमा,ठाणे
पाचवा क्रमांक यशोदा भोर, पुणे

मेन्स फिजिक्स पहिला गट
1 सत्यम यादव , ठाणे
2 श्रेयश गोष्टे, ठाणे
3 रत्नेश सिंग, पालघर
4 उमेश यादव , पुणे
5 प्रथमेश उफाळे ठाणे

मेन्स फिजिक्स दुसरा गट
1 मारी शामू, ठाणे
2 गुरु करमकर, ठाणे
3 श्रेयश म्हात्रे, रायगड
4 रोहन गोगावले, पुणे
5 सियल शेख, सातारा

55 किलो गट
1 दिपेश भोईर , ठाणे
2 प्रमोद सूर्यवंशी, सांगली
3 जीवन सूर्यवंशी, ठाणे
4 सोमनाथ पाल, पुणे
5 महेश पाटोळे, पुणे

60 किलो गट
1 संतोष यादव, ठाणे
2 सागर नागावकर, ठाणे
3 नितेश केळेकर, ठाणे
4 रवि भागडे, नाशिक 3
5 प्रतिक मगदूम, कोल्हापूर

65 किलो गट
1 नितीन म्हात्रे , पश्चिम ठाणे
2 वैभव चव्हाण, संभाजी नगर
3 सचिन सावंत, पुणे
4 राज थापा, पालघर
5 ऋषिकेश कदम, सांगली

70 किलो गट
1 पंचाक्षरी लोणार , सोलापूर
2 बबन दास, मुंबई उपनगर
3 रोशन नाईक, पालघर
4 राकेश कांबळे, सांगली
5 वैभव महाजन,

75 किलो गट
1 विनायक कुरले, मुंबई उपनगर
2 मयुरेश मोरे, ठाणे
3 हाफिज आतार, सांगली
4 श्रीनिवास वास्के, पुणे
5 मयूर कनसकर, पुणे

80 किलो गट
1 अनिकेत राजगुरू, पुणे
2 पठाण अमेर, छत्रपती संभाजी नगर
3 संदीप उले, रायगड
4 महेश शेट्टी, पश्चिम ठाणे
5 ऋत्विक जाधव, पुणे

85 किलो गट
1 ओमकार नलावडे, पुणे
2 अमन कुट्टी, कोल्हापूर
3 विश्वनाथ बकाली, सांगली
4 गौतम शिर्के, सांगली
5 अनस कुरेशी, नाशिक

85 किलो पुढील गट
1 शशांक वाकडे, मुंबई उपनगर
2 शुभम वेताळ, ठाणे
3 गणेश उरणकर, मुंबई
4 सुमित थापा, ठाणे
5 अर्षद मेवेकरी, सांगली

या स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री किरण जाधव व श्री विलास कडलक सर यांनी केले.