Shirur Loksabha Constituency – Dr Amol Kolhe | “हडपसर मधून डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुकले

HomeBreaking Newsपुणे

Shirur Loksabha Constituency – Dr Amol Kolhe | “हडपसर मधून डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुकले

गणेश मुळे Mar 11, 2024 10:26 AM

Pune MP | निवडून आल्यानंतर खासदार लोकांच्या प्रश्नांत लक्ष घालू लागले! हे ही नसे थोडके!
Mahavikas Aghadi Pune | रवींद्र धंगेकर, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे  एकाच वेळी अर्ज भरणार!
Dr Amol Kolhe | Aala Bailgada Song | ‘आला बैलगाडा’ गाण्याचे डॉ. अमोल कोल्हेंकडून कौतुक

Shirur Loksabha Constituency – Dr Amol Kolhe | “हडपसर मधून डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुकले

| महाविकास आघाडी एकमुखाने डॉ. कोल्हे यांच्या पाठीशी – बैठकीत निर्धार

 

Shirur Loksabha Constituency – Dr Amol Kolhe –
(The Karbhari News Service) – आगामी शिरूर लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकासआघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक येथील कन्यादान मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्ष एकमुखाने डॉ.अमोल कोल्हे यांच्या पाठीशी उभा राहणार असून चांगल्या मताधिक्याने त्यांना निवडून आणणार असा विश्वास या बैठकीत सर्वपक्षीयांनी व्यक्त केला.

यावेळी खा.डॉ. अमोल कोल्हे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार महादेव बाबर, काँग्रेस निरीक्षक गोपाळ तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, माजी उपमहापौर निलेश मगर,माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप, संगीता ठोसर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देशमुख, काँग्रेस ओबीसी शहराध्यक्ष प्रशांत सुरसे, राष्ट्रवादी हडपसर अध्यक्ष प्रविण तुपे, काँग्रेस अध्यक्ष दिलीप शंकर तुपे, सीमा सावंत, विद्या होडे, रुपाली शिंदे, महिला अध्यक्ष वंदना मोडक, कार्याध्यक्ष सविता मोरे, पल्लवी सुरसे, शितल शिंदे, सुशीला गुंजाळ, नितीन आरु आदींसह सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

The Karbhari - Hadapsar mahavikas aghadi

गद्दारांची गद्दारी लोकसभा निवडणुकीत गाढली पाहिजे, महादेव बाबर व शिवसेनेने काम केले म्हणून मागच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले नंतर ते शिवसेना कार्यकर्त्यांना विसरले, यांना पाडण्यासाठी आता हडपसर मध्ये सर्वांनी काम करावे अशा शब्दात शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी चेतन तुपे यांचे नाव न घेता टीका केली.

हेवेदावे बाजूला ठेऊन भाजपला पराभूत करा, बजेट व महाविकास आघाडी समन्वय समिती जबाबदारी आमदारांची होती त्यांनी भूमिका बदलली, कार्यकर्ते नाराज झाले, हडपसर मध्ये समन्वय समिती स्थापन करून नियोजन केले जाईल. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. भाजपला सांगा रामाचे झाले आता कामाचे सांगा मोदी परिवार म्हणजे घोटाळे केलेले अन भाजप मध्ये गेले आहेत, मीडियावर दबाव आणला जात आहे, 400 खासदार आणून संविधान बदलण्याचा डाव आहे, हा डाव हणून पाडला पाहिजे असे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.

तुतारी घराघरात पोहोचली पाहिजे आढळराव पाटील यांना 55 हजाराची आघाडी 2019 ला होती ते गद्दार झाले तेच समोर असतील डॉ.कोल्हे यांना तीच आघाडी देणार, हडपसर मध्ये सर्वात आधी महाविकास आघाडी करून हडपसला राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून आणला, हडपसर ची वाट लावली, कामे झाली नाहीत, अपमानस्पद वागणूक दिली, त्यांना त्यांची जागा दाखविणार या शब्दात माजी आमदार महादेव बाबर यांनी विद्यमान आमदारांवर टीका केली.

माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी आपले मनोगत मांडले.
शिवसैनिक निखारा आहे, ही निवडणूक देशाच्या भविष्याची निवडणूक आहे, अबकी बार 400 पार हे केवळ कार्यकर्त्यांच मनोबल वाढविण्यासाठी आहे, राहुल गांधी यांच्या यात्रेने पायाखालची जागा सरकली, दक्षिण भारतात भाजप नाही, इंडिया आघाडी देशात येत आहे, शिरूर मध्ये तुतारी चिन्ह घराघरात पोहोचविले पाहिजे, या मतदारसंघात महायुतीला उमेदवार नाही, कार्यकर्त्यांमंध्ये अस्वस्थता आहे, देणारा दिल्लीत मागणारा झाला या शब्दात अजित दादांवर टीका केली, लोकशाही टिकविण्यासाठी भाजपला पराभूत करा असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले.