SDD Pune Corporation | 10वी, 12 वी शिष्यवृत्ती सहित 61 योजनांची मुदत 10 दिवसांनी वाढवणार | PMC समाज विकास विभागाचा निर्णय | जाणून घ्या कालावधी
SDD Pune Corporation | पुणे | महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या (PMC Social Devlopment Department) वतीने शहरातील नागरिकांसाठी विविध 61 कल्याणकारी योजना (PMC Welfare Scheme) राबवल्या जातात. यामध्ये शैक्षणिक अर्थसहाय्य, दिव्यांग कल्याणकारी योजना, महिला व बालकल्याण योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, युवक कल्याणकारी योजना अंतर्गत विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. या योजनांसाठी अर्ज करण्याची मुदत डिसेंबर महिन्यातच संपली आहे. मात्र नागरिकांना अर्ज करण्यासाठी अजून एक संधी दिली जाणार आहे. 5 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत नागरिकांना सर्व योजनांसाठी अर्ज करता येतील. अशी माहिती समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास (Nitin Udas PMC) यांनी दिली. (SDD Pune Corporation)
योजनांचे अर्ज dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावरती (PMC Website) नागरिकांना उपलब्ध आहेत. ज्या नागरिकांना पुणे मनपाच्या (PMC Pune) योजनांचे लाभ घ्यावयाचे आहेत, त्यांनी योजनांसाठीची पात्रता तपासून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज ऑनलाईन पद्धतीने dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावरती भरावेत.
पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत राहणाऱ्या १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Maulana Abul Kalam Azad Scholarship) आणि १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (PMC DBT 12th Scholarship) पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजना अंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले होते. याचा कालावधी 29 डिसेंबर ला समाप्त झाला आहे. या कालावधीत महापालिकेकडे 10841 अर्ज प्राप्त झाले आहेत. (Pune Municipal Corporation scholarship Scheme)
| Save as Draft मध्ये अर्ज ठेवलेल्या लोकांना होणार फायदा
शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज समाज विकास विभागाकडे (PMC Devlopment Department) प्राप्त झाले आहेत. तथापि, विभागाच्या असे निदर्शनास आले होते कि अनेक अर्जदार हे दिलेल्या अटी व शर्तीनुसार कागदपत्राची पूर्तता करीत नाही. तसेच अर्ज हा save as draft मध्ये ठेवत होते. त्यामुळे महापालिका समाज विकास विभागाने सूचना केली होती कि, अर्जदाराने भरलेला अर्ज हा save as draft मध्ये तसाच ठेवला असेल तर कागदपत्राची पूर्तता त्वरित करून अर्ज submit करावा. तसे न केल्यास सदरचा अर्ज रद्द बातल ठरविण्यात येणार आहे. असे असतानाही 2669 रद्द झाले आहेत. मात्र आता या मुदतीत या अर्जदारांना आपले अर्ज Submit करता येतील.
नितीन उदास यांच्या माहितीनुसार शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्थसंकल्पात 21 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. उमेदवारांचे अर्ज आल्यानंतर तात्काळ बिल तपासण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. जवळपास 3 हजार बिले तयार झाली आहेत. लवकरच सगळी बिले तयार करून Dbt च्या माध्यमातून अर्जदारांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील.