Science Day | शहराचे पर्यावरण राखण्यास प्राधान्य द्या | प्राजक्ता जाधव यांचे विद्यार्थ्यांना आवाहन  | रिजन्ड शाळेत विज्ञान दिन साजरा

HomePolitical

Science Day | शहराचे पर्यावरण राखण्यास प्राधान्य द्या | प्राजक्ता जाधव यांचे विद्यार्थ्यांना आवाहन | रिजन्ड शाळेत विज्ञान दिन साजरा

Ganesh Kumar Mule Mar 02, 2025 6:41 PM

Mohan Joshi | भारतीय टेनिकाईट महासंघ | माजी आमदार मोहन जोशी यांची ‘चीफ पेट्रॉन’पदी निवड
Zika Virus in Pune | झिकाचा प्रसार रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्सची निर्मिती करा | मुरलीधर मोहोळ यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 
Santosh Lalwani ends 10 days fast in support of Ladakh

Science Day | शहराचे पर्यावरण राखण्यास प्राधान्य द्या | प्राजक्ता जाधव यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

| रिजन्ड शाळेत विज्ञान दिन साजरा

 

Pune News – (The Karbhari News Service) – सद्यस्थितीत शहरांमधील प्रदुषण वाढते आहे, अशा स्थितीत विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरण रक्षणाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ग्रंथालय सेलच्या अध्यक्ष प्राजक्ता जाधव यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले.

बिबवेवाडीतील रिजन्ड शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिवस (दि.२८ फेब्रुवारी) साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून आणि श्रीं ना पुष्पहार अर्पण करून विज्ञान प्रदर्शनाला प्रारंभ करण्यात आला. त्यात इयत्ता १ली ते ९वी च्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) ग्रंथालय सेलच्या शहर अध्यक्ष प्राजक्ता जाधव, शाळेच्या व्यवस्थापिका शशिकला ढोले पाटील, प्रिन्सिपल अनुराधा आलम आणि शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक कार्यक्रमाला उपस्थित होते.

पर्यावरणातील मुलभूत साठ्याचा पुनर्वापर करून पर्यावरण संरक्षण-संवर्धन, अन्न साखळी, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, कला आदी क्षेत्रातील महत्वपूर्ण विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट सादर केले. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांनी आपापल्या प्रोजेक्ट बद्दल नेमक्या शब्दांमध्ये अचूक माहिती दिली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी प्राजक्ता जाधव यांनी संवाद साधला. पर्यावरण संवर्धन करण्यासाठी वृक्ष लागवड करणे, त्यांची काळजी घेणे, आपल्या अवतीभवतीचा परिसर स्वच्छ राखणे, ह्या सहज पण आवश्यक बाबी त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. तसेच प्रिन्सिपल, शिक्षक, कर्मचारी यांचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: