Sandip Kadam PMC | सार्वजनिक स्वच्छता, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व कचरा वर्गीकरणाच्या अनुषंगाने शहरातील  व्यावसायिक आस्थापनांना दिल्या जाणार  नोटीसा | उपायुक्त संदीप कदम यांची माहिती 

Homeadministrative

Sandip Kadam PMC | सार्वजनिक स्वच्छता, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व कचरा वर्गीकरणाच्या अनुषंगाने शहरातील  व्यावसायिक आस्थापनांना दिल्या जाणार  नोटीसा | उपायुक्त संदीप कदम यांची माहिती 

Ganesh Kumar Mule Jul 31, 2025 7:59 PM

Maha Puja of Shri Vitthal-Rukmini | बीड जिल्ह्यातील मुरली भगवान नवले आणि जिजाबाई मुरली नवले या वारकरी दांपत्याला महापूजेचा मान
Agricultural University Vs PMC Pune | .. म्हणून कृषी विद्यापीठाने पुणे महापालिकेला दिला कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा!
BJP Pune | 1 हजार जुन्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांचा किंवा कुटुंबीयांचा सन्मान करण्यात येणार  | वर्धापनदिनानिमित्त शहर भाजपचा स्नेह-मेळावा

Sandip Kadam PMC | सार्वजनिक स्वच्छता, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व कचरा वर्गीकरणाच्या अनुषंगाने शहरातील  व्यावसायिक आस्थापनांना दिल्या जाणार  नोटीसा | उपायुक्त संदीप कदम यांची माहिती

 

Pune PMC News – (The Karbhari News Service)  – सार्वजनिक स्वच्छता, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व कचरा वर्गीकरणाच्या अनुषंगाने शहरातील  व्यावसायिक आस्थापनांना  नोटीसा दिल्या जाणार आहेत. यासाठी महापालिका आयुक्त यांची मान्यता देखील प्राप्त झाली आहे. या अनुषंगाने प्रत्येक आरोग्य निरीक्षकाने दैनंदिन स्वरूपात किमान २५ आस्थापनांना भेट देऊन सर्वांना नोटीस बजाविण्यात याव्यात. त्यानुसार उपायुक्त, परिमंडळ क्र. १ ते ५, महापालिका सहाय्यक आयुक्त, सर्व क्षेत्रिय कार्यालये यांना उपायुक्त संदीप कदम यांनी हे आदेश दिले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC Solid Waste Management)

महाराष्ट्र शासनाद्वारे प्लास्टिक व थर्मोकोल इत्यादी पासून बनविलेल्या अविघटनशील वस्तूंचे उत्पादन वापर, विक्री, वाहतूक यांचे नियमनाकरीता अधिसूचना  २३ मार्च २०१८ पासून पारित करण्यात आलेली आहे. तसेच पर्यावरण मंत्रालयाच्या  नोटीफिकेशन नुसार आणि पर्यावरण (संस्था) कायदा १९८६ आणि नागरी घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी) नियम २०१६ नुसार प्रत्येक व्यवसाय धारकाने व्यवसायाच्या ठिकाणी निर्माण होणारा कचरा संकलनासाठी आपले व्यवसायाच्या ठिकाणी दर्शनी भागात ओला व सुका कचरा संकलित करणेसाठी दोन बकेट ठेवणे बंधनकारक आहे. तसेच व्यावसायिक आस्थापनेच्या अंतर्गत स्वच्छतेसोबतच व्यवसायाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे ही महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ अन्वये संबंधित व्यवसाय धारकाची जबाबदारी आहे.

परंतु शहरातील अनेक ठिकाणी व्यावसायिक आस्थापनांद्वारे या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे आढळून येते. यासाठी व्यावसायिक आस्थापनांना द्यावयाच्या नोटीसा तयार करण्यात आल्या आहेत.   या अनुषंगाने प्रत्येक आरोग्य निरीक्षकाने दैनंदिन स्वरूपात किमान २५ आस्थापनांना भेट देऊन सर्वांना नोटीस बजाविण्यात याव्यात व त्याचा दैनंदिन अहवाल  घनकचरा व्यवस्थापन मुख्य विभागाकडे सादर करावा. असे आदेश संदीप कदम यांनी दिले आहेत.

उपायुक्त कदम यांच्या माहितीनुसार व्यावसायिक आस्थापनांना एकूण तीन नोटीसा दिल्या जाणार आहेत. यामध्ये पहिली नोटीस ही प्लास्टिक बाबत असेल. त्यानुसार प्लास्टिकचे उत्पादन, वितरण, साठवण आणि विक्री किंवा प्लास्टिकचा वापर अथवा थर्मोकोल चा वापर केल्यास दंड केला जाईल. यात पहिल्या वेळी ५ हजार दंड, दुसऱ्या वेळी १० हजार दंड आणि तिसऱ्या वेळी २५ हजार दंड व तीन महिन्याची कैद अशी तरतूद आहे.

दुसरी नोटीस हि कचरा वर्गीकरण बाबत असेल. यात आस्थापनेच्या ठिकाणी ओला आणि सुका कचरा अलग करण्यासाठी दोन बकेट ठेवणे आवश्यक आहे. असे नाही केल्यास पहिल्या वेळी ३०० तर पुढील प्रत्येक वेळी ५०० रुपये दंड असणार आहे.

तर तिसरी नोटीस ही आस्थापनेच्या आसपासचा १० मीटर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी असेल. तसे नाही झाल्यास ५०० रुपये पर्यंतचा दंड केला जाईल. तसेच वारंवार असे केल्यास संबंधित अस्थापना बंद करण्याची देखील यात तरतूद आहे.

त्यानुसार यावर कारवाई सुरु केली जाणार असल्याचे संदीप कदम यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: