RPI | Shirdi Loksabha | शिर्डी लोकसभेची जागा आरपीआय ला सोडा | आरपीआय ची मागणी 

HomeपुणेBreaking News

RPI | Shirdi Loksabha | शिर्डी लोकसभेची जागा आरपीआय ला सोडा | आरपीआय ची मागणी 

गणेश मुळे Mar 26, 2024 2:36 PM

Maharashtra Cabinet Meeting Decisions | राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय जाणून घ्या
Marathi Bhasha | अभिजात दर्जानंतर मराठीसाठी सर्वांनी काम करणे महत्त्वाचे
Vande Bharat Express | पुणे- हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभ!

RPI | Shirdi Loksabha | शिर्डी लोकसभेची जागा आरपीआय ला सोडा | आरपीआय ची मागणी

 

RPI | Shirdi Loksabha – (The Karbhari News Service) – शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात यावी. अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महायुती कडे करण्यात आली आहे. (Republican Praty of India)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पुणे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या अध्यक्षते खाली आज पक्ष कार्यालया मध्ये पार पडली. या बैठकी मध्ये रिपब्लिकन पक्षाचे राज्याचे, पश्चिम महाराष्ट्राचे तसेच पुणे शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकी मध्ये मित्र पक्षा बद्दल कार्यकर्त्यानी नाराजी व्यक्त केली.  बाबासाहेबांच्या विचारातील पक्षाला एक ही जागा देत नसतील तर युती काय कामाची? तसेच शिर्डीची जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात यावी, असा ठराव सदर बैठकी मध्ये मांडण्यात आला. सदर ठरावाचे पत्र 28 मार्च ला पुणे शहरामध्ये होणाऱ्या राज्य कार्यकारणीच्या बैठकी मध्ये देण्यात येणार आहे. अशी माहिती शहर अध्यक्ष संजय सोनवणे यांनी दिली.

या बैठकीला उपस्थित शहराध्यक्ष संजय सोनवणे, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, डॉ. सिद्धार्थ धेंडे, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, बसवराज गायकवाड, श्याम सदाफुले, वीरेन साठे, महादेव ददी हे उपस्थित होते.