Republic Day In PMC | पुणे महानगरपालिकेच्या वतीने साजरा करण्यात आला भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन!
Pune Municipal Corportion – (The Karbhari News Service) – भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन पुणे महानगरपालिकेच्या वतीने साजरा करण्यात आला. याला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. (76th Republic Day in PMC)
प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणातील थी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्टीत पुतळ्यास पुष्प अर्पण केली. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण केली. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच सकाळी ८.०५ वाजता मा. प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले.
त्यापूर्वी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) पृथ्वीराज बी. पी. तसेच विविध उपआयुक्त, विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS