Ravindra Dhangekar Pune Loksabha | पुण्याच्या विकासाला खिळ का बसली ? | रविंद्र धंगेकरांचा भाजपला सवाल
| महाविकास आघाडीच्या प्रचाराची सांगता
Pune Mahavikas Aghadi – (The Karbhari News Service) – पुणेकरांनी भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी निवडून देवूनही पुण्याच्या विकासाला खिळ का बसली ? असा सवाल काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांना केला. तेसच या प्रश्नाचे उत्तर पुणेकर मतदानाच्या माध्यमातून देतील आणि आपणास विजयी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही निवडणुक धनशक्ती विरुद्ध जणशक्तीची असून पुढील दोन दिवसात पुण्यात पैशाचा पाऊस पडेल. यावर प्रशासनाने योग्य ते प्रतिबंधनात्मक उपाय करावेत, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा ईशाराही धंगेकर यांनी दिला.
पुणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी, इंडिया फ्रंटचे काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचाराच्या सांगता समारंभाप्रसंगी काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, नागपूरचे आमदार विकास ठाकरे, निवडणुक प्रमुख मोहन जोशी, माजी आमदार उल्हास पवार, दीप्ती चवधरी, पूजा आनंद, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राज्य प्रवक्ता गोपाळ तिवारी, अमीर शेख, माध्यम समन्वयक राज अंबिके, आदींसह महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटचे पदाधिकारी उपस्थित होते.
धंगेकर म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारासाठी काढलेल्या पदयात्रा, मेळावा, सभांना पुणेकरांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला असून या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ मी पिंजून काढला आहे. गेल्या तीस वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत असल्याने पुण्याचे प्रश्न मी जाणतो. सर्वांना सोबत घेवून मी सामान्यांचे प्रश्न सोडवणार आहे. मोदींच्या कारभारामुळे नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. गेल्या दहा वर्षात पुण्याच्या विकासाला खिळ का बसली, हे पुणेकर या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपला विचारतील आणि महाविकास आघाडीला विजयी करतील. पुणे धार्मिक सलोख्याचे शहर आहे, ही परंपरा मी कायम राखणार आहे.
वंचित व एमआयएम भाजपची बी टीम असून ही निवडणुक पुणेकरांनी हातात घेतली आहे. भाजप पैसे देवून सभांना गर्दी करत होते. आज व उद्या भाजपचे लोक पैशाचा महापूर आणतील, दमदाटी करतील, पोलिसांनी यावर निर्बंध आणावेत, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू.
माझी ही दहावी निवडणुक आहे, माझ्या पहिल्या निवडणुकीपासून सोबत असलेले लोक आजही सोबत आहेत. मी पुणेकरांचा कार्यकर्ता आहे. भाजपने काय विकास केला, हे काल राज ठाकरे सभेत बोलले आहे. ते पुण्याच्या विकासावर बोलले, त्यांचा रोख भाजपकडे होता. या सभेत त्यांनी कमळाला मत द्या, असे एकदाही म्हंटले नाही. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे.
प्रचाराची सांगता आम्ही प्रत्येक विधानसभा मतदार संघात रॅली काढून केली. संविधान टिकवण्यासाठी आम्ही सदैव उभे राहू आणि या निवडणुकीत चांगल्या मताने निवडून येऊ, असा विश्वासही धंगेकर यांनी व्यक्त केला.
डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, केंद्रातील सरकारकडून सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्याचा राग नागरिकांमध्ये आहे. ईडी सीबीआयचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे सर्वसामांन्यांमध्ये भाजप विषयी राग आहे. पुण्याचे वातावरण महाविकास आघाडीसाठी चांगले आहे. धंगेकर यांनी नगरसेवक व आमदार म्हणून चांगले काम केले आहे. धंगेकर सर्वसामान्य परिस्थितीतून आलेले आहेत. ते चोवीस तास सर्वसामांन्यांची कामे करतात. काँग्रेसचे अनुभवी नेते शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी आहेत. पुण्यासारखेच वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे.
मोहन जोशी म्हणाले, निवडणुक सुरू झाल्यापासून 37 पदयात्रा, कॉर्नर सभा घेवून काँग्रेसचा न्यायनामा घरोघरी पोहचवला आहे. महागाई व बेरोजगारीमुळे धंगेकर यांचा विजय निश्चित आहे. दहा वर्षात केलेले एक काम भाजप नेत्यांना सांगता येत नाही. पक्ष फोडले, हे जनतेला आवडलेले नाही. भाजपची ताकद कागदावरच आहे, हे प्रचारावरून पुढे आले आहे. ज्या दिवशी कसबा पोटनिवडणुक जिंकली, तेव्हाच लोकसभेचा गड काँग्रेस जिंकणार हे निश्चित झाले होते. या निवडणुकीत प्रचाराची पातळी आम्ही राखली, कमरेखालचे आरोप केले नाहीत. याउलट भाजपने खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. भाजपची बी टीम असलेल्या वंचित व एमआयएमचा कोणताही परिणाम पुणेकरांवर व निवडणुकीवर होणार नाही. आम्ही निवडणुकीपूर्वी रेसकोर्स मैदान संरक्षण खात्याकडे मागितले होते, त्यावेळी त्यांनी आम्ही राजकीय पक्षांना मैदान देत नाही, असे लेखी दिले. त्यानंतर आचारसंहिता असतानाही संरक्षण विभागाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेसाठी रेसकोर्स मैदान दिले. मोदींच्या सभेनंतर पुन्हा भाजपला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा घ्यावी लागली. यातच भाजपचा पराभव स्पष्ट होतो.
उल्हास पवार म्हणाले, ही निवडणुक हिंदु मुस्लिम मुद्द्यावर आली, एका मतदार संघात मतदान सुरू असताना शेजारच्या मतदार संघात पंतप्रधान सभा घेतात, यातच मोदी व भाजपचा पराभव होणार हे स्पष्ट होते.
—
मोदी सरकाने व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडवली: अभिषेक मनू सिंघवी
पुणे : मोदी सरकारच्या दहा वर्षाच्या काळात व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासांना सामोरे जावे लागले आहे. 2004 ते 2014 या काळात जी परिस्थिती होती ती परिस्थिती मोदी सरकारने ठेवली नाही, त्यामुळे मोदी सरकार देशातून हद्दपार करण्यासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व जेष्ठ विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी केले. जगभरात भारताची प्रतिमा उंचावलेली होती मात्र पंतप्रधान मोदी यांनी ती घालवली आहे, अशी टीका यावेळी त्यांनी केली. व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती मोदी सरकारने विस्कटली आहे. ती पुन्हा बसवण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी रविंद्र धंगेकर यांना बहुमताने निवडून द्या, असे यावेळी त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ व्यापारी मेळावा मुकुंद नगर येथे ३डी बँक्वेट येथे आयोजित करण्यात आला होता.
त्यावेळी सिंघवी बोलत होते. यावेळी विठ्ठलशेठ मणियार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस एड. अभय छाजेड, पोपटलाल ओस्तवाल, पुना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार, ज्येष्ठ व्यापारी राजेश शहा, राजेंद्र बाठीया, राजेंद्र फुलपगर, राजेंद्र गुगुळे, शांतीलाल कटारिया, जनक व्यास, भोला अरोरा, भारत सुराणा, वालचंद संचेती, मिलिंद फडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल, माजी नगरसेविका संगीता तिवारी, हिरालाल राठोड, बाळासाहेब भुजबळ आदी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
प्रस्ताविक काँग्रेसचे जेष्ठ नेते अभय छाजेड यांनी केले. ते म्हणाले, मोदी सरकारने देशाची आर्थिक परिस्थिती बिघडवली. जीएसटी सारख्या जाचक अटी आणल्या. कोरोना काळात व्यापाऱ्यावर निर्बंध घातले. त्यामुळे मोदी सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी एका दिलाने रवींद्र धंगेकर यांच्या पाठीमागे उभे रहा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी धंगेकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असेही यावेळी त्यांनी नमूद केले.
अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, मोदी सरकारला आपली सत्ता जाण्याची भीती आहे म्हणूनच पहिल्यापासून 400 पार चा नारा त्यांनी दिला आहे. आता समाजाने जागरूक होऊन भाजपाला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. मोदी सरकारच्या काळात तरुणांना बेरोजगारी तसेच सामन्यांना आर्थिक घडी विस्कटलेलीचा सामना करावा लागत आहे. तरीदेखील मोदी जगभर फिरून आपली प्रतिमा उंचावलेली दाखवतात. परंतू भारताची प्रतिमा मोदींनी घालवलेली आहे. देश पुढे नेण्यासाठी तसेच प्रगतीपथावर आणण्यासाठी इंडिया आघाडीला सत्तेत आणावे. नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून भाजपची सत्ता उलथून टाकावी असे, आवाहन यावेळी त्यांनी केले.
लोकशाही संपवण्यासाठी मोदींनी घाट घातला आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ भाजप संपवत आहे. माध्यमे मोदी सरकारने हातात घेऊन त्यांचा हवा तसा वापर करत आहे. निवडणूक आयोग ईडीचा वापर आपल्या हितासाठी करत आहे, हे लोकशाहीसाठी चिंताजनकबाब आहे. लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी पुढे आले पाहिजे, असेही यावेळी त्यांनी नमूद केले.
वालचंद संचेती म्हणाले रवींद्र धंगेकर गोरगरिबांच्या कामाला येणारा सामान्य कार्यकर्ता आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे ते निवडून आले आहेत. आता पुणे लोकसभा मतदारसंघात खासदारकीला विजयी होणार आहेत. तळागाळातील नागरिक त्यांना निवडून देणार आहेत. कार्यक्रमाचे आभार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व्यापारी सेलचे अध्यक्ष भरत सुराणा यांनी मांडले.
गिरीष बापट यांचे कार्यालय कुणी फोडले होते ? – माजी मंत्री सुनिल केदार यांचा सवाल
पुण्याचे दिवंगत खासदार गिरीष बापट यांचे कार्यालय आणि भाजपचे पक्ष कार्यालय जून २००७ मध्ये कुणी फोडले होते ? आसा सवाल उपस्थित करत माजी क्रीडा मंत्री सुनिल केदार यांनी भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली. पुण्याचा खासदार हा बापट यांचा वारसदार म्हणून दिल्लीत जाणार आहे. त्यामुळे तो सुसंस्कृत व पुणेकरांचे हित जपणारा हवा, असेही केदार म्हणाले. पुण्याच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी काल झालेल्या पावसात पुण्यातील रस्ते जलमय का झाले, याचे उत्तर द्यावे, असे आव्हानही केदार यांनी दिले.
पुणे लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केदार बोलत होते. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, जेष्ठ पत्रकार सुनिल माने उपस्थित होते.
सुनिल केदार म्हणाले, पुण्यात काल जो पाऊस झाला, तेव्हा शहरातील रस्ते जलमय झालेले पाहिले. त्यावेळी वेगवेगळ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पाहणारे आणि पुण्याच्या विकासाच्या गप्पा मारणारे आठवले. त्यांनी केलेला विकास कुठे शोधू असा प्रश्न पडला. पुण्याच्या नदीची वाट लावली आहे. जून २००७ साली बापट व भाजप पक्षाचे कार्यालय कुणी फोडले ? भापट यांनी काय चुक केली होती का ? त्यावेळी कोणाचे कोणाचे फोटो खाली पडले होते ? त्यामुळे पुण्यातील महायुतीच्या उमेदवाराला भाजपच्या नावावर मते मागण्याचा अधिकार आहे का ? याचा विचार होणे गरजेचे आहे. खा. बापट शहरातील सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेवून जात होते. पुणे शहर अभ्यासू व विचारवंतांचे आहे. या शहराला टिळक फुलेंचा वारसा आहे. त्यामुळे पुणेकरांनी निवडलेला खासदार कोण आहे ? हे दिल्लीत पाहिले जाणार आहेत. त्यामुळे पुणेकरांनी योग्य उमेदवार निवडून पाठवणे गरजेचे आहे.
सुनिल माने म्हणाले, भाजपचा प्रवास उलट्या दिशेने सुरू आहे. एससी एसटी साठी अर्थसंकल्पात करावयाची तरतूद मोदींनी दहा वर्षात केली नाही. बापट यांचे प्रचारप्रमुख असतानाही मुरलीधर मोहळ सिंगापूरला निघून गेले. शहराध्यक्षही प्रचारात सक्रीय नव्हते. वाहतुक कोंडीमुळे मोहोळांना परवा स्वत:च्याच प्रचाराला पोहचता आलं नाही. वाहतुकीच्या सुधारणेसाठी मोहोळांकडे व्हिजन नाही. समाविष्ट गावांना पाणी नाही, पायाभुत सुविधा नाहीत. ज्यांना भाजपच्या कार्यालयावर हल्ला केला त्यालाच उमेदवारी दिली, हे भाजप कार्यकर्त्यांना दुख आहे. बापट यांना आपल्या भाषणात कधीही पुण्याश्वरचा मुद्दा आणला नाही. मात्र, नितेश राणे या जहाल हिंदुत्ववादी माणसाला पुण्यात आणून त्यांची महापालिकेसमोर सभा करणे व त्याचे संयोजन मोहोळ यांनी केले, यामुळे पुण्याचे भले होणार नाही. याचे दु:ख बापट यांना होते.
उल्हास पवार म्हणाले, भाजपचे दोन दिग्गज नेते नागपूरात असताना विधान परिषद, जिल्हा परिषद केदार यांनी काँग्रेसच्या ताब्यात आणली.
——————
तुम्ही नागपूरला या नाही तर मी बारामतीत येतो.
हा कसा निवडून येतो, तो कसा निवडून येतो, असे म्हणून आणि कॉलर पकडून मत मिळत नाहीत. कोण कसा निवडून येतो, हे बघायचं असेल तर त्यांनी नागपूरला यावं नाही तर मी बारामतीला येतो, असे आव्हान सुनील केदार यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.
सर्व धर्म समभाव हाच भारताचा पाया: यशोमती ठाकूर
| पर्वती विधानसभा मतदारसंघात पालक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे :सर्व धर्म समभाव हाच भारताचा पाया आहे, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाच्या निरीक्षक आमदार यशोमती ठाकूर यांनी केले.
पुणे लोकसभा मतदार संघाचे महा विकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघात पालक मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी एक हजारहून अधिक पालकांची उपस्थिती होती.
यावेळी ठाकूर म्हणाल्या की, काँग्रेस हा असा एकमेव पक्ष आहे, जो सर्व धर्म समभाव जोपासणारा आहे. आपल्या थोर महापुरुषांनीही आपल्याला हीच शिकवण दिली आहे. विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करायचे असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही.त्यासाठीच महा विकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी थोर महापुरुषांच्या प्रतिमा हातात घेवून सर्व धर्म समभाव हाच भारताचा पाया आहे.त्यासाठी सदैव कटिबध्द राहायचे आणि काँग्रेसचे हात बळकट करायचे हा निर्धारही करण्यात आला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल म्हणाले की, गेल्या दहा वर्षात पुण्याचा विकास ठप्प झाला आहे. विकासाची दूरदृष्टी ही काँग्रेसकडे आहे. धार्मिक द्वेषाची पेरणी करून शहरांची काय देशाची प्रगतीही होणार नाही. सर्व धर्म समभाव असेल तरच देशाचा खऱ्याअर्थाने विकास होणार आहे. आजचा जो विकास झालेला दिसतोय त्यामागे काँग्रेस पक्षाचे योगदान मोठे आहे. त्यामुळे आता पुण्याच्या विकासाचे समीकरण दृढ करायचे असेल तर रवींद्र धंगेकर यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करायचे आहे. असेही आबा बागुल म्हणाले. यावेळी पूजा आनंद, घनःश्याम सावंत, मसलकर, संतोष गेळे आदींसह पदाधिकारी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.