Raj Thackeray Pune Rally | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी  सभा

HomeBreaking Newsपुणे

Raj Thackeray Pune Rally | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी  सभा

गणेश मुळे May 07, 2024 1:51 PM

MNS : Sainath Babar : पुण्यात उद्या हनुमान चालीसा लावणारच  : मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांचा इशारा 
Raj Thackeray : आपापल्या प्रभागात जनसंपर्क वाढवा  : राज ठाकरेंचा मनसैनिकांना सल्ला 
Maharashtra Navnirman Sena : भोंग्यावरून मनसेत दोन मतप्रवाह!

Raj Thackeray Pune Rally | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी  सभा

 

Raj Thackeray Pune Rally – (The Karbhari News Service) –  पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Loksabha Constituency) भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol Pune Loksabha)  यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray MNS) यांची जाहीर सभा सारसबाग परिसरात येत्या शुक्रवारी (ता. 10 मे) सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar MNS) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

त्या आधी सभेच्या नियोजनासाठी मनसे कार्यालयात भाजप आणि मनसेच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला मनसे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर, मनसे शहर प्रमुख साईनाथ बाबर, किशोर शिंदे, गणेश सातपुते, हेमंत संभूस, अजय शिंदे, योगेश खैरे, जयराज लांडगे, बाळा शेडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नांदगावकर म्हणाले, पुणेकर मतदार विशेषतः युवक राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यास उत्सुक असतो. मनसेला मानणारा मोठा मतदार पुणे लोकसभा मतदारसंघात आहे. मनसेचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोहोळ यांच्या प्रचारात एकदिलाने उतरले आहेत. ही सभा यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व जण काम करत आहोत. सभेला उच्चांकी गर्दी होईल असा विश्वास आहे. सभास्थानी प्रत्यक्ष जाऊन पाहाणी केली आणि आढावा घेतला. वाहतुकीची कोंडी होणार नाही यासाठी प्रयत्न करीत आहोत.