Pune closed: 11 ऑक्टोबर ला पुणे बंद

HomeBreaking Newsपुणे

Pune closed: 11 ऑक्टोबर ला पुणे बंद

Ganesh Kumar Mule Oct 08, 2021 12:42 PM

PMC Building Devlopment Department | कोथरूड परिसरात पुणे महापालिकेकडून हॉटेल्स वर कारवाई | १०३४९ चौ.फूट अनधिकृत बांधकाम हटवले 
Sarpmitra Akash Jadhav | सर्पमित्र आकाश जाधव यांची उल्लेखनीय कामगिरी
Water Cut In Pune | गुरुवारी बंद ठेवल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी ही केली मागणी!

11 ऑक्टोबर ला पुणे बंद

: महाविकास आघाडी चा निर्णय

: लखिमपुर खिरी हत्याकांड निषेध व संविधान रक्षणार्थ

पुणे: लखीमपूर खिरी हत्याकांड च्या निषेध म्हणून 11 ऑक्टोबर ला पुणे बंद ठेवण्यात येणार आहे. पुण्यात महाविकास आघाडी च्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

: मोदी सरकार चा निषेध

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या आलिशान गाडीने आंदोलनातून परत जाणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडले. या घटनेत 8 जण प्राणास मुकले. या गाडीत मिश्रा यांचा मुलगा आशिष होता.त्याच्या चिथावणीने हे हत्याकांड घडविण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून तसा प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल झाला आहे. या घटनेस पाच दिवस उलटूनही अजून आशिष यास अटक झाली नाही. या दुर्घटनेचा प्रतिध्वनि अजून शांत झालेला नसताना हरियाणात भाजपच्या खासदाराच्या गाडीने पुन्हा शेतकर्‍यांना उडवले. त्यात जखमी शेतकरी गंभीर अवस्थेत आहे कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि सत्ताधारी पक्ष यांच्या कडूनच सुरू असलेल्या या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आणि मोदी सरकारच्या हुकूमशाही धोरण व कार्यपद्धती विरुद्ध संविधान वाचवण्याचा निर्धार करण्यासाठी 11 ऑक्टोबरला सोमवारी पुणे बंद असेल. असा निर्णय आज येथे झालेल्या महाविकास आघाडी व इतर घटक पक्ष आणि संघटनांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार  परिषदेत पुणे बंदची घोषणा करण्यात आली. बैठकीला पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप,शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीचे निमंत्रक नितीन पवार, आमदार चेतन तुपे,माजी आमदार मोहन जोशी व कमल ताई ढोले,पुणे मनपा काँग्रेस गटनेते आबा बागुल,माजी महापौर अंकुश काकडे,जनता दल शहराध्यक्ष विठ्ठल सातव, आपचे संयोजक संदेश दिवेकर,राष्ट्र सेवा दला चे पदाधिकारी दत्ता पाकिरे, लोकायतचे नीरज जैन आदी मान्यवर व विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

: उद्या कार्यकर्त्यांच्या बैठका

यावेळी लखीमपुर खीरी हत्याकांड तसेच केंद्र शासन करत असलेल्या शासकीय यंत्रणाचा दुरुपयोग आणि विरोधकांवरची दडपशाही याचा तीव्र निषेध करण्यात आला. देशाच्या इतिहासातील अशा अत्यंत अपवादात्मक हत्याकांडाबद्दल आणि त्यात झालेल्या अन्नदात्याच्या भीषण मृत्यूविषयी देशाचे पंतप्रधान आणि सत्ताधारी पक्षाच्या वतीने कोणी काही प्रतिक्रिया देत नाही याबद्दलही बैठकीत तीव्र खेद व्यक्त करण्यात आला . लखीमपुर-खीरी हत्याकांडाच्या निषेधाचा ठराव राज्य मंत्रिमंडळात करण्यात आला. या हत्याकांडाच्या निषेधार्थ राज्यव्यापी बंदचे आवाहन राज्य सरकार मध्ये सहभागी असलेल्या शिवसेना,राष्ट्रवादी, काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या राज्य प्रमुखांनी केले आहे.या आवाहनाला प्रतिसाद देण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. बंदच्या तयारीसाठी उद्या शनिवार 9 ऑक्टोबर रोजी पुण्याच्या आठही विधानसभा मतदारसंघात सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका ठरवण्यात आल्या.या बैठकांमध्ये कार्यकर्ते बंद चे नियोजन करतील. पुणे बंद मध्ये शहर बस वाहतूक, रिक्षा, भुसावल, भाजीपाला बाजार,  पथारी व्यवसायिक निराळे व्यवसायिक आस्थापना इत्यादी सर्व ठिकाणी बंद पाळण्यात येईल. तसे आवाहन संबंधितांना येत्या दोन दिवसात करण्याचे ठरविण्यात आले

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0