Pune Water Meter | नळजोडांना मीटर बसविणे आवश्यक |अन्यथा नळजोड बंद केला जाणार | अतिरिक्त आयुक्त यांचा इशारा!
M J Pradip Chandren IAS – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेमार्फत नळजोडांना मीटर बसविणेत येणार असून, त्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन यांनी पुणेकरांना केले आहे. मीटर बसविणेसाठी विरोध करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर पाणी नळजोड बंद करणे अथवा कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करणे अशा स्वरुपाची कारवाई करण्यात येईल. असा इशारा अतिरिक आयुक्तांनी दिला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
पुणे महापालिका हद्दीमध्ये अस्तित्वातील लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्यक असणारे पाणी व प्रत्यक्ष धरणामधून उचलण्यात येणारे पाणी यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे निदर्शनास येते. या अनुषंगाने पाणीपुरवठ्याबाबत वेळोवेळी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये चर्चा होते व गळतीचे प्रमाण जास्त असून, त्याकरिता आवश्यक उपाययोजना करून, गळतीचे प्रमाण कमी करणेबाबत आदेशित केले जाते. यासाठी पुणे शहरामध्ये समान पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली असून, त्यामध्ये गळती शोधणे व दुरुस्ती करणेचा समावेश आहे. गळती शोधण्यासाठी वॉटर ऑडीट करणे आवश्यक असून, त्यासाठी सर्व नळजोडांना मीटर बसविणे आवश्यक आहे. त्यानुसार मीटर बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पुढील एक महिन्यामध्ये पुणे शहरातील उर्वरित १००% एएमआर मीटर बसविण्याचे नियोजन आहे.
असे निदर्शनास येत आहे कि, काही भागांमध्ये पाण्याचे मीटर बसविण्यास विरोध होत आहे. सर्व मीटर बसविल्यानंतर गळती शोधून पाणीवापर कमी करणे शक्य होणार आहे. संपूर्ण मीटर तातडीने बसविणे आवश्यक आहे. अन्यथा संपूर्ण शहरामध्ये पाणीकपात करणे अपरिहार्य होणार आहे.
तरी, सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते कि, पुणे महानगरपालिकेमार्फत मीटर बसविणेत येणार असून, त्यासाठी सहकार्य करावे. मीटर बसविणेसाठी विरोध करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर पाणी नळजोड बंद करणे अथवा कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करणे अशा स्वरुपाची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे अतिरिक्त आयुक्त यांनी म्हटल आहे.

COMMENTS