Pune Water Issue | 7.25 TMC पाणी पुण्यासाठी राखून ठेवण्याची पालकमंत्री यांच्याकडे मागणी

HomeपुणेBreaking News

Pune Water Issue | 7.25 TMC पाणी पुण्यासाठी राखून ठेवण्याची पालकमंत्री यांच्याकडे मागणी

गणेश मुळे Apr 22, 2024 1:14 PM

PMC Property Tax Lottery | मुदतीत मिळकत कर भरलेल्या नागरिकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण
PMC 75th Anniversary | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे महानगरपालिका अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास भेट
Booster Dose | Corona | उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस

Pune Water Issue | 7.25 TMC पाणी पुण्यासाठी राखून ठेवण्याची पालकमंत्री यांच्याकडे मागणी

| सजग नागरिक मंचाच्या विवेक वेलणकर यांनी केली मागणी

Pune Water Issue – (The Karbhari News Service) – निवडणूका संपल्यानंतर पुण्यात पाणीकपात (Pune Water Scarcity) सुरु होईल अशी लोकांमध्ये भिती आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणसाखळीत 7.25 TMC पाणी पुण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेश जलसंपदा विभागास (Department of Water Resources) द्यावे आणि पुणेकरांस आश्वस्त करावे. अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar Sajag Nagrik Manch) यांनी पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली आहे.
वेलणकर यांच्या निवेदनानुसार खडकवासला धरण साखळीत आज रोजी 9.4 TMC पाणी शिल्लक आहे. पुणे शहर दरमहा खडकवासला धरणसाखळीतून 1.6 TMC पाणी वापरते. 31 जुलै पर्यंत पुणे शहरासाठी खडकवासला धरणसाखळीतून 5.25 TMC पाण्याची गरज आहे. उन्हाळ्याचा कडाका बघता पुढील तीन महिन्यात किमान 1.5 TMC पाण्याचे धरणातून बाष्पीभवन होईल. जून महिन्यात वारीसाठी किमान अर्धा TMC पाणी लागेल.
हे सर्व बघता ३१ जुलैपर्यंत किमान ७.२५ TMC पाणी राखून ठेवणे गरजेचे आहे. आत्ता शेतीसाठी सुरु असलेले आवर्तन आवरते घेण्याची गरज आहे. कारण परत मे अखेर दौंडसह गावांना पिण्यासाठी दीड TMC चे आवर्तन सोडणे आवश्यक ठरणार आहे. पुणे हे देशातील पहिले शहर आहे की जे महिन्याला अर्धा TMC सांडपाणी शुद्धीकरण करून शेतीसाठी पुनर्वापरासाठी सोडते आहे. त्यामुळे शेतीला पाणी कमी पडेल ही भिती अनाठायी आहे. असे वेलणकर यांनी म्हटले आहे.
  निवडणूका संपल्यानंतर पुण्यात पाणीकपात सुरु होईल अशी लोकांमध्ये भिती आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणसाखळीत 7.25 TMC पाणी पुण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेश आपण जलसंपदा विभागास द्यावे आणि पुणेकरांस आश्वस्त करावे.
–  विवेक वेलणकर,अध्यक्ष, सजग नागरिक मंच,  पुणे