Pune Water Cut | आज शहराच्या या भागात सकाळी पाणीपुरवठा बंद राहणार | दुपारी कमी दाबाने पाणीपुरवठा
PMC Water Supply Department – (The Karbhari News Service) – वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकीच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम १७ जुलै रोजी रात्री उशिरापर्यंत करण्यात आले. त्यामुळे चांदणी चौक झोन वरील भागाचा पाणीपुरवठा १८ रोजी शुक्रवारी सकाळी बंद राहणार असुन दुपारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यत आले आहे. (Pune Water Cut News)
पाणीपुरवठा बंद असणारा भागः-
१) वारजे जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर – पाषाण साठवण टाकी भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्करखिडीकडील परिसर, शास्त्रीनगर, व्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, बाणेर, बालेवाडी, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाण तांडा, मोहन नगर, सुस रोड, धनकुडे वस्ती, पंचवटी, म्हाळुंगे, सुस इ.

COMMENTS