Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

Homeadministrative

Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

Ganesh Kumar Mule Jun 06, 2025 3:39 PM

Pune Water Issue | 7.25 TMC पाणी पुण्यासाठी राखून ठेवण्याची पालकमंत्री यांच्याकडे मागणी
PMC Water Supply Scheme | लोहगांव आणि वाघोली गावाच्या समान पाणीपुरवठा योजनेसाठी 173 कोटींचा खर्च!
Pune Water Supply | उद्या शहराच्या या भागात कमी दाबाने होणार पाणीपुरवठा!

Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

 

Pune Water Cut News – (The Karbhari News Service) – येत्या गुरुवारी   वारजे जलशुद्धीकरण केंद्र अंतर्गत बालेवाडी जकात नाका टाकी, सन हॉरीझोन टाकी, बाणेर वेस्ट टाकी, पाषाण लेक टाकी, लोकसेवा (सुस) पाषाण बाणेर पाषाण लिंक रोड टाकी, पॅनकार्ड क्लब रोड टाकी येथे मुख्य पाण्याच्या लाईनला नव्याने टाकण्यात आलेल्या लाईन जोडणे व वॉल्व बसविणे करिता तसेच भामा आसखेड अंतर्गत येणा-या भागामध्ये पाणी वितरणामधील त्रुटी दूर करण्यासाठी चाचणी घेणे कामी करावयाचे कामे करणेकरिता गुरुवार  १२ जून रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे व शुक्रवार १३ जून रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे. (PMC Water Supply Department)

पाणीपुरवठा बंद असणारा भाग :-

) वारजे जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर –
पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सॅटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी, चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्करखिंडीकडील परिसर, शास्त्रीनगर, व्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, बाणेर, बालेवाडी, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाण तांडा, मोहन नगर, सुस रोड, धनकुडे वस्ती, पंचवटी, म्हाळुंगे, सुस इ.

२) वारजे जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीतील पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर :-
बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडीपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकर नगर, दत्तनगर इ.

३) भामा आसखेड जलशुद्धीकरण प्रकल्पामधून पाणीपुरवठा करण्यात येणारा भाग :-
धानोरी, वडगाव शेरी, खराडी, विमाननगर, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, येरवडा, संजय पार्क, लोहगाव, बोराटे वस्ती, शेजवळ पार्क खराडी इ.