Pune Unseasonal Rain | अवकाळी पावसाने पुण्यात शेकडो घरात पाणी घुसले; चेंबर तुंबले!

Homeadministrative

Pune Unseasonal Rain | अवकाळी पावसाने पुण्यात शेकडो घरात पाणी घुसले; चेंबर तुंबले!

Ganesh Kumar Mule Apr 02, 2026 9:28 PM

Pune Traffic News | पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्वंकष वाहतूक आराखडा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ
Time Bound Promotion | PMC Pune | कालबद्ध पदोन्नतीसाठी जवळपास १५ हजार कर्मचारी ठरताहेत पात्र! | ६० ते ६५ कोटी पर्यंत येऊ शकतो खर्च
7th pay Commission |केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!  | नवीन वर्षात महागाई भत्ता (DA) मोजण्याचे सूत्र बदलणार!

Pune Unseasonal Rain | अवकाळी पावसाने पुण्यात शेकडो घरात पाणी घुसले; चेंबर तुंबले!

| महापालिका आयुक्तांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून घेतला आढावा

 

Pune Rain News – (The Karbhari News Service) –  पुणे महानगरपालिका क्षेत्रात  आज झालेल्या अवकाळी पावसामुळे चेंबर तुंबलेबाबत, घरामध्ये पाणी घुसलेबाबत साधारण १४५  तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त झालेल्या तक्रारी संबंधित क्षेत्रिय कार्यालयामार्फत मनुष्यबळ पाठवून तात्काळ मदत पुरविण्यात आली आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. महापालिका आयुक्त,  अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) व (वि), शहर अभियंता, मुख्य अभियंता (मलनिस्सारण),  मुख्य अभियंता (विद्युत),  मुख्य अभियंता (पथ), अधिक्षक अभियंता (भवन रचना विभाग),  उप आयुक्त (कर आकरणी व करसंकलन) यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्ष या ठिकाणी भेट देऊन पुणे शहरातील पावसामुळे उदभवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिका आयुक्त यांनी शहरातील पाणी साठलेल्या ठिकाणी व शहरातील विविध घडलेल्या घटनांबाबत तात्काळ आवश्यक असणारी सर्व कार्यवाही करणेबाबतचे आदेश सर्व खातेप्रमुख व विभागप्रमुखांना दिले. (Pune Municipal Corporation – PMC)

 

यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने  सर्व विभागांसमवेत समन्वय ठेऊन तात्काळ मदतीविषयी माहिती दिली त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय यांना पाणी शिरलेल्या ठिकाणी तात्काळ पंचनामा करणेविषयी व महापालिका सहाय्यक आयुक्त स्तरावर कळविण्यात आले आहे. नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये संपर्काकरिता पुणे महानगरपालिका आपत्कालीन कक्ष संपर्क क्रमांक (२४x७) कार्यरत आहे.

१) ०२०-२५५०१२६९
२) ०२०-२५५०६८००

उप आयुक्त (परिमंडळ), महापालिका सहाय्यक आयुक्त, उप अभियंता, क्षेत्रिय स्तरावरील कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक पाणी साठणाऱ्या ठिकाणी तात्काळ आवश्यक असणारी मदतीकरिता पोहचले. या ठिकाणी नागरिकांना आवश्यक असणारी व पाणी साठणाऱ्या ठिकाणी मदतीकरिता अग्निशमन दलाकडील कर्मचारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी हे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित होते. क्षेत्रिय स्तरावरील JCB, युटीलिटी व्हॅन, झाडपडी गाडी, डंपर, इलेक्ट्रीकल वाहन व त्याचप्रमाणे कटर्स, रीसायक्लर मशीन इत्यादीचा वापर करून पाण्याचा निचरा करण्यात आला. सदर ठिकाणी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाकडील सर्व सेवक या ठिकाणी उपस्थित होते.

पुणे शहरामध्ये प्रामुख्याने खडकवासला परिसर, सिंहगड रोड, बिबवेवाडी पुणे शहराच्या पेठेचा भाग कोंढवा, विश्रामबाग वाडा, फर्गुसन कॉलेज रोड, स्वारगेट, समतानगर, कोरेगाव पार्क, गुंजन चौक, पुणे विद्यापीठ, उंड्री, हडपसर गाडीतळ, वारजे या भागातून पाणीसाठले बाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याचप्रमाणे सिंहगड रस्ता येथे झाड पडून महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सर्व उप आयुक्त, महापालिका सहाय्यक आयुक्त बांधकाम विभाग, पथ विभाग, मोटर वाहन विभाग, मलनिस्सारण विभाग, पाणीपुरवठा, विद्युत विभाग अग्रिशमन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी समन्वय साधून तात्काळ पाणी साठणाऱ्या ठिकाणी तसेच शहरातील अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीस प्रतिसाद दिला व तात्काळ मदत करण्यात आली.

महापौर, पदाधिकारी व सभासद यांनी क्षेत्रिय स्तरावर शहरातील परिस्थितीची माहिती घेतली व तात्काळ मदत करणेविषयी सूचना केल्या. तसेच महापौर यांनी शहरातील वस्तीभागामध्ये पाणी शिरलेले ठिकाणी व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याविषयीचे आदेश दिले आहेत.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: