Pune Theur Rain | पुरात अडकलेल्या ७० ग्रामस्थांना पीएमआरडीएच्या बचाव पथकाकडून सुरक्षित स्थळी हलवले | थेऊर परिसरातील रूपे वस्तीतील घटना

Homeadministrative

Pune Theur Rain | पुरात अडकलेल्या ७० ग्रामस्थांना पीएमआरडीएच्या बचाव पथकाकडून सुरक्षित स्थळी हलवले | थेऊर परिसरातील रूपे वस्तीतील घटना

Ganesh Kumar Mule Sep 15, 2025 9:12 PM

Ravindra Binwade IAS | नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास शासन मंजूरी – नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे
PMC Scholarship For 10th, 12th Student | 10 वी, 12 वी शिष्यवृत्ती योजनांसाठी 10841 अर्ज | सूचना करूनही 2669 अर्ज save as draft मध्ये! 
Selfie with Navadurga |  “नवदुर्गाचा सन्मान” व “सेल्फी विथ नवदुर्गा” या कार्यक्रमांचे आयोजन | पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा नवरात्रोत्सवाच्या काळात उपक्रम

Pune Theur Rain | पुरात अडकलेल्या ७० ग्रामस्थांना पीएमआरडीएच्या बचाव पथकाकडून सुरक्षित स्थळी हलवले | थेऊर परिसरातील रूपे वस्तीतील घटना

: पीडीआरएफ पथकाकडूनही शर्तीचे प्रयत्न

 

Pune Rain News – (The Karbhari News Service) – पुणे शहर आणि जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे बहुतांश ठिकाणच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूर परिस्थिती उद्भवत आहे. सोमवारी पहाटे ३ वाजता थेऊर (ता. हवेली) गावातील रुपे वस्ती परिसरातील ओढ्याला पूर आल्याने यात अडकलेल्या ग्रामस्थांना पीएमआरडीए व पीडीआरएफ पथकातील जवानांनी मदतकार्य करून सुमारे ७० पेक्षा अधिक जणांना सुखरूप बाहेर काढले. (Pune PMRDA)

हवेली तालुक्यातील थेऊर गावातील रूपे वस्ती परिसरात ओढ्याला पूर आल्याने जवळपास १५० लोकांच्या वस्तीत सोमवारी पहाटे ३ वाजता पाणी शिरले होते. या घटनेची माहिती मिळतात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वाघोली अग्निशमन केंद्रातील जवान आणि पीडीआरफ पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून घरांमध्ये अडकलेल्या सुमारे ७० पेक्षा अधिक ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलव‍िण्यात आले.

या पुरामध्ये म्हशी, शेळ्या, कोंबड्या हे पाळीव प्राणी काही प्रमाणात वाचवण्यात आले. तर काही वाहून गेले आणि काहींचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र, जीवितहानी झाली नाही, अशी माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली. या बचाव पथकात अग्निशमन केंद्र आध‍िकारी विजय महाजन, जितेंद्र तळेले, महेश आव्हाड, शुभम बढे, शुभम चौधरी, उमेश फाळके, सुरज इंगवले, साईनाथ मोरे, किरण राठोड, अभिषेक पावर, प्रकाश मदने, तेजस डांगरे, सिद्धांत जाधव, शुभम पोटे, दिग्विजय नलावडे, सागर जानकर, करण पाडुळे, राजेंद्र फुंदे, प्राणिल दराडे, लहू मुंडे, राहुल शिंदे आदी जवानांचा समावेश होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: