Sachin Adekar on Union Budget | फक्त स्वप्नात झुलवत ठेवणारा अर्थसंकल्प | सचिन आडेकर

HomeBreaking News

Sachin Adekar on Union Budget | फक्त स्वप्नात झुलवत ठेवणारा अर्थसंकल्प | सचिन आडेकर

Ganesh Kumar Mule Feb 01, 2026 8:17 PM

RSS | लाल किल्ल्यावरून आरएसएसचे कौतुक करण्याची आवश्यकता काय ?  भारतीय जनता पार्टीने उत्तर द्यावे  | कॉंग्रेस ची मागणी 
Maharashtra News | राज्यातील 5 ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती
Pune PMC News | नगरसचिव आणि क्रीडा अधिकारी पदावर नेमणुकी बाबतचे महापालिका आयुक्त यांचे आदेश जारी 

Sachin Adekar on Union Budget | फक्त स्वप्नात झुलवत ठेवणारा अर्थसंकल्प | सचिन आडेकर

 

Pune News – (The Karbhari News Service) – मुळातच पुणे शहरासाठी या केंद्रीय अर्थसंकल्पात काहीही मिळालेले नाही. ग्रोथ हब साठी मिळणारे पाच वर्षातील पाच हजार कोटी रुपये हे एकट्या पुणे शहरासाठी नसून पुणे शहर पिंपरी चिंचवड व पी एम आर डी ए यासाठी आहे. याचा वैयक्तिक फायदा पुणे शहराला काहीही होणार नाही. अशी टीका एक जागरूक पुणेकर म्हणून सचिन आडेकर यांनी केली आहे. (Union Budget 2026)

काँग्रेसच्या काळात पुणे हे ग्रोथ हबच होते.  मनमोहन सिंग  पंतप्रधान असताना केंद्रसरकारकडून मोठ्या प्रमाणावर ग्रोथ हब साठी ज्या पायाभूत सुविधा लागतात, त्यासाठी सर्व पायाभूत सुविधा करता जवाहरलाल नेहरू शहरी विकास योजनेतून 10 ते 12 हजार कोटी रुपये फक्त पुणे शहरासाठी निधी उपलब्ध करून दिलेला होता. फक्त नाव बदललं म्हणजे सुविधा होत नाहीत, त्यासाठी प्रामाणिक इच्छा असावी लागते. याचे कारण याआधी देखील पंतप्रधान मोदीजींनी पुणे हे स्मार्ट सिटी योजनेमध्ये घेतले होते आणि पुण्याचा झालेला भकास विकास संपूर्ण पुणे शहराने पाहिला आहे.

या योजनेतून किती रोजगार निर्माण होईल आणि किती तरुणांना नोकरी मिळतील हा देखील संशोधनाचा विषय आहे. याआधी देखील मोदी सरकारने दोन करोड युवकांना दरवर्षी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. असे आडेकर यांनी म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0