Pune Smart City | पुणे स्मार्ट सिटी मिशन समाप्त : 900 कोटीच्या खर्चाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा!
Smart City Pune – (The Karbhari News Service) – आज पासून पुणे स्मार्ट सिटी मिशन समाप्त होत आहे. कुठलाही महत्त्वकांक्षी केंद्रीय कार्यक्रम हा विशिष्ट कालावधीसाठी आणि विशिष्ट उद्देश पूर्तीसाठी आखला जातो त्या कालावधीमध्ये त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित असते. त्यानुसार या प्रकल्प मध्ये ९०० कोटी खर्च करण्यात आले आहेत. याचा लेखाजोखा स्मार्ट सिटी च्या CEO नी जनतेसमोर मांडावा. अशी मागणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी केली आहे. (Pune Smart City News)
पुणे महानगरपालिकेची स्मार्ट सिटी ही अखिल भारतीय स्पर्धेमध्ये प्रथम आली होती. देशाचे प्रधानमंत्री मोदी यांनीस्मार्ट सिटी मिशन देशाला पुण्यातून अर्पण केले होते.
पुणे स्मार्ट सिटी ची खालील प्रमाणे प्रमुख वैशिष्ट्य आणि उद्देश होते.
१) पुणे स्मार्ट सिटी मोहिमेचे उद्दिष्ट पुण्याला शाश्वत, राहण्यायोग्य आणि लवचिक शहरात रूपांतरित करणे आहे.
२) अभियान शाश्वत पायाभूत सुविधा विकास, सार्वजनिक सुविधा वाढवणे आणि संसाधनांच्या कार्यक्षम वापरासाठी स्मार्ट उपाय लागू करणे.
३) शहर विश्वासार्ह आणि सुलभ सार्वजनिक सेवा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि हिरवीगार जागा प्रदान करून नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करणे
४) डिजिटल परिवर्तन आणि नवोपक्रम, डिजिटल परिवर्तन, ई-गव्हर्नन्स आणि नागरिक-केंद्रित सेवा चालविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे.
५) स्मार्ट वाहतूक व्यवस्था: बुद्धिमान वाहतूक, व्यवस्थापन, रिअल-टाइम वाहन ट्रॅकिंग आणि स्मार्ट पार्किंग उपाययोजना लागू करणे.
६) स्मार्ट ग्रिड प्रणाली वीज वितरणाचे रिअल-टाइम देखरेख आणि नियंत्रणासह बुद्धिमान ऊर्जा व्यवस्थापन सक्षम करणे.
७) नागरिकांचा सहभाग – A) मोबाइल अॅप्स, सोशल मीडिया आणि समुदाय पोहोच कार्यक्रमांद्वारे नागरिकांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे.
८) पुणे स्मार्ट सिटी मोहिमेअंतर्गत काही उल्लेखनीय प्रकल्पांमध्ये हे समाविष्ट आहे.
a)डिजिटल एक्सपिरीयन्स सेंटर
b) नागरिकांना एकत्र येऊन विकास परिस्थितींवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ.
c) स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग: पारंपारिक प्रकाश योजने ऐवजी ऊर्जा-कार्यक्षम एलईडी दिवे.
d) ई-बस: वायू प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बसेस सादर करणे.
e) विमानतळ एक्सप्रेस सेवा,विमानतळावर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी एक समर्पित शटल सेवा.
या (smart City mission) उपक्रमांचे उद्दिष्ट पुणे शहराला त्याच्या नागरिकांसाठी अधिक राहण्यायोग्य, शाश्वत आणि लवचिक शहर बनवणे हा होता.
या संकल्पनेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हे मिशन सुरू केले होते. आता हे मिशन संपल्यानंतर खालील बाबींचा आढावा घेणे आणि तो स्मार्ट पुणे संकेतस्थळावर टाकणे आवश्यक आहे असे आम्हाला वाटते. असे निवेदनात म्हटले आहे.
१) पुणे स्मार्ट सिटी ५८ प्रकल्प स्वीकारले
२) ९०० कोटी रुपये खर्च केले.
३) स्वीकारलेले ५८ प्रकल्प कुठले ?
४) त्यातली अंमलबजावणी झालेले प्रकल्प कुठले ?
५) अंश:ता अंमलबजावणी झालेले प्रकल्प कुठले ?
६) सुरूच झाले नाहीत असे प्रकल्प कुठले ?
७) प्रत्येक प्रकल्पावर किती रक्कम खर्ची पडली ?
८) किती रक्कम देणे बाकी आहे ?
९) प्रकल्प सल्लागार कोण होते ?
१०) त्यांनी ५८ प्रकल्पाचे DPR तयार केले आहे का ?
११) त्या सल्लागारांना एकंदरीत किती सल्ला फी दिली ?
१२) उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किती रकमेची आणि किती वेळेची आवश्यकता आहे ?
१३) हे सर्व प्रकल्प पुणे महानगरपालिकेकडे वर्ग केल्यामुळे आणि महानगरपालिकेने अंदाजपत्रक मांडल्यामुळे यासाठी कुठल्या कुठल्या निधीला वर्गीकरणाद्वारे कात्री लावून या प्रकल्पाकडे पैसे वर्ग करणार ?
१४) का हे प्रकल्प वाऱ्यावर सोडणार ? याबाबत आज अस्तित्वात असलेल्या स्मार्ट सिटी च्या मुख्याधिकाऱ्याने जाहीर केले पाहिजे ही आमची मागणी आहे. असेही निवेदनात म्हटले आहे.
COMMENTS