Pune Smart City | स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या पुण्यात दोन दिवसांच्या पावसात महावितरण च्या सेवेची दैना!

HomeBreaking Newsपुणे

Pune Smart City | स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या पुण्यात दोन दिवसांच्या पावसात महावितरण च्या सेवेची दैना!

गणेश मुळे Jul 25, 2024 1:12 PM

Pune Power Supply | पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात वीज पुरवठा विस्कळीत | महानगरपालिकेच्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची शिवसेनेची मागणी
Power Cut In Pune News | महावितरण अधिकाऱ्यांनो कारभार सुधारा अन्यथा नागरिकांसह भव्य मोर्चा काढू
MSEDCL | Vivek Velankar | गेल्या पाच महिन्यांपासून महावितरणने विश्वासार्हतेचे निर्देशांक प्रसिध्दच केलेले नाहीत | महावितरणच्या ढिसाळ कारभारात सुधारणा कधी होणार!

Pune Smart City | स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या पुण्यात दोन दिवसांच्या पावसात महावितरण च्या सेवेची दैना!

 

Pune Rain | MSEDCL – ( The Karbhari News Service)– पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे आणि अनेक यंत्रणांच्या कामाच्या दर्जाचे पितळ उघडे पडायला सुरुवात झाली आहे. रस्त्यांची दुर्दशा महापालिकेची अब्रू चव्हाट्यावर आणतीये तर काल मध्यरात्रीपासून शहरातील पेठांपासून ते कात्रज पर्यंतच्या अनेक भागात अनेक तास लाखो नागरीक अंधारात बसल्यामुळे महावितरणच्या कारभाराचे पण धिंडवडे निघाले आहेत. अशी टीका सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली आहे. (Vivek Velankar Sajag Nagrik Manch)

वेलणकर म्हणाले,  दोन्हीही यंत्रणा सगळा दोष पावसावर ढकलून मोकळे होत आहेत. मुंबई मध्ये पुण्यापेक्षा जास्त पाऊस असूनही वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना अपवादानेच का दिसतात, यांचे उत्तर महावितरणकडे नाही. मान्सून पूर्व देखभाल दुरुस्ती पुण्यासारख्या स्मार्ट सिटी मधे काय दर्जाची झाली आहे याचा आरसाच आजच्या अंधाराने दाखवून दिला आहे.

——-

पुणे हे महावितरणला राज्यातले सगळ्यात जास्त महसूल देणारे आणि नगण्य वीजचोरी असणारे शहर असूनही याचे फळ पुणेकरांना काय मिळतंय ते दिसतंच आहे. महावितरणकडे असलेल्या वीज पुरवठ्याच्या मक्तेदारी मुळे ही मस्ती सुरू आहे. जोपर्यंत टेलिफोन प्रमाणे वीज क्षेत्रातही स्पर्धा येत नाही तोपर्यंत पुणेकरांची अवस्था मुकी बिचारी कुणी हाका अशीच राहणार आहे यात शंका नाही.

विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे