Pune Shivsena | पुण्याच्या विविध समस्यांविरोधात 30 जुलैला शिवसेनेचे तीव्र आंदोलन | प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात महापालिकेला धारेवर धरणार

Homeadministrative

Pune Shivsena | पुण्याच्या विविध समस्यांविरोधात 30 जुलैला शिवसेनेचे तीव्र आंदोलन | प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात महापालिकेला धारेवर धरणार

Ganesh Kumar Mule Jul 25, 2026 6:15 PM

Shivsena Agitation Against Rahul Gandhi | राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे शहर शिवसेना प्रचंड आक्रमक | जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन
34 Villages Committee | समाविष्ट 34 गावांसाठी 18 लोकप्रतिनिधींची समिती | जाणून घ्या 18 सदस्यांची यादी 
Shivsena on Toxic Liquor | प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात शेकडो लिटर बनावट गावठी दारूचा साठा उध्वस्त

Pune Shivsena | पुण्याच्या विविध समस्यांविरोधात 30 जुलैला शिवसेनेचे तीव्र आंदोलन | प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात महापालिकेला धारेवर धरणार

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभार, भ्रष्टाचार आणि मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात 30 जुलै रोजी  आंदोलन करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळणे, रस्ते, कचरा व्यवस्थापन ते स्मशानभूमीपर्यंत सर्वच क्षेत्रात महापालिका अपयशी ठरल्याचा आरोप करत शिवसेनेकडून या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. (Pramod Nana Bhangire)

आंदोलनाचे प्रमुख मुद्दे

1. पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळत आहे
शिवसेने उपस्थित केलेला पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे पुणेकरांना मिळणारे पाणी. पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याने पुणेकरांच्या जीवाची किंमत नेमकी किती असा सवाल करण्यात आला आहे. यामुळे शहरात साथीचे रोग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

2. आयुक्तांच्या आदेशाला किंमत नाही, भ्रष्टाचार बोकाळला
आयुक्तांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप शिवसेने केला आहे. की भ्रष्टाचार अधिक ताकदवान झाला आहे का असा प्रश्न उपस्थित करत प्रशासनातील अनास्था आणि आर्थिक गैरव्यवहार यावर बोट ठेवण्यात आले आहे.

3. ठेकेदार मालामाल आणि पुणेकर बेहाल
शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि ठेकेदारांना दिल्या जाणाऱ्या कंत्राटांवरून शिवसेने टीका केली आहे. ठेकेदार मालामाल होत असून पुणेकर मात्र खड्डे आणि कचऱ्यातून वाट काढत आहेत. वा पुणे महापालिका तुझे सलाम अशा शब्दात व्यंग करण्यात आले आहे.

4. दिवसाढवळ्या LED चोरीला जात आहेत
महापालिकेच्या मालमत्तेचीच सुरक्षा नाही असा आरोप करत दिवसाढवळ्या रस्त्यावरील LED दिवे चोरीला जात असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. महापालिकेची मालमत्ताच सुरक्षित नाही, मग पुणेकर तरी कसे सुरक्षित राहणार असा सवाल केला आहे.

5. प्रत्येक पावसात पुणे जलमय होते
पावसाळ्यात शहरातील अनेक भागात पाणी साचण्याची समस्या दरवर्षी आहे. प्रत्येक पावसात पुणे जलमय होते, मग आपत्ती व्यवस्थापन फक्त कागदावरच आहे का असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. नालेसफाई आणि ड्रेनेज व्यवस्थेच्या नावाखाली होणाऱ्या खर्चावरही शंका व्यक्त केली आहे.

6. कर कोट्यवधींचा, पण सुविधा शून्य
पुणेकरांकडून महापालिका कराच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल करते. मात्र त्याच्या बदल्यात पाणी नाही, रस्ते खराब आहेत, कचऱ्याची विल्हेवाट लागत नाही अशी अवस्था आहे. आमच्या इथे पुणेकरांची शुद्ध फसवणूक करून मिळेल अशी टीका यानिमित्ताने करण्यात आली आहे.

7. पुण्यातली स्मशानभूमीही गळकी
शेवटच्या घटकांनाही महापालिकेने वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप करत पुण्यातील स्मशानभूमीची छत गळत असल्याचे चित्र समोर आणले आहे. महानगरपालिकेची संवेदनशीलता तरी जिवंत आहे का असा सवाल करण्यात आला आहे.

8. घनकचरा व्यवस्थापनात  घोटाळा
शहरातील कचरा व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या भूमिग्रीन कंपनीवरही शिवसेने आरोप केले आहेत. घनकचरा व्यवस्थापन सुरु आहे की भूमिग्रीनला कोट्यवधींचा मलिदा मिळत आहे असा प्रश्न उपस्थित करत या कराराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

9. महापालिका पुणेकरांसाठी की भ्रष्टाचाऱ्यांसाठी
शेवटी पुणे महानगरपालिका पुणेकरांसाठी चालते की भ्रष्टाचाऱ्यांच्या सोयीसाठी असा थेट सवाल करत संपूर्ण प्रशासनाच्या कामकाजावर अविश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकर मूलभूत सुविधांसाठी वंचित आहेत. महापालिका प्रशासन फक्त टॅक्स वसूल करण्यात व्यस्त आहे. नागरिकांच्या आरोग्याशी, सुरक्षेशी खेळणाऱ्या या कारभाराविरोधात 30 जुलैला रस्त्यावर उतरून जाब विचारल्याशिवाय पर्याय नाही.

या आंदोलनात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने तोडगा न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0