Pune Sex Ratio | पुणे महापालिकेचा गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक विभाग कमी पडतोय का ? | महापालिका आयुक्तांनी शहानिशा करण्याची सजग नागरिक मंचाची मागणी 

Homeadministrative

Pune Sex Ratio | पुणे महापालिकेचा गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक विभाग कमी पडतोय का ? | महापालिका आयुक्तांनी शहानिशा करण्याची सजग नागरिक मंचाची मागणी 

Ganesh Kumar Mule Sep 24, 2025 11:03 AM

Water Closure | Pune | महत्वाची बातमी | गुरुवारी पुणे शहरात पाणी बंद | शुक्रवारी कमी दाबाने पाणी
Sharad Pawar | साळुंखे, पवार यांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणला- ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे गौरवोद्गार
PMC Pune | Mahavikas Aaghadi March | महाविकास आघाडी पुणे महापालिकेवर काढणार मोर्चा 

Pune Sex Ratio | पुणे महापालिकेचा गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक विभाग कमी पडतोय का ? | महापालिका आयुक्तांनी शहानिशा करण्याची सजग नागरिक मंचाची मागणी

 

PMC Health Department – (The Karbhari News Service) – गेल्या चार वर्षांपासून पुण्यात मुलींचा घटलेला जन्मदर चिंताजनक आहे. यात पुणे महापालिकेचा गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक विभाग कमी पडतोय का ? असा सवाल सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच विभागाची याबाबत शहानिशा करावी, अशी मागणी वेलणकर यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Vivek Velankar Sajag Nagrik Manch)

 

Related News : Pune Sex Ratio | सावित्रीबाईंच्या पुण्यात 1 हजार मुलांमागे फक्त 890 मुली!

 

याबाबत वेलणकर यांनी सांगितले कि, माहिती अधिकार दिनात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पुण्यातील मुलामुलींच्या जन्मदरा संदर्भात माहिती मिळाली जी अत्यंत धक्कादायक आहे. २०२० साली दर एक हजार मुलांमागे ९४६ मुलींचा जन्मदर नोंदला गेला. मात्र गेल्या ४ वर्षांपासून तो दर एक हजार मुलांमागे ९१० च्या आसपास रेंगाळत आहे. शिक्षणाचे , संस्कृतीचे माहेरघर असलेल्या पुणे शहरासाठी ही धोक्याची घंटा आहे. दर हजार मुलांमागे किमान ९५० मुलींचा जन्मदर हा सामाजिक आरोग्यासाठी योग्य समजला जातो. ज्याच्या जवळपास आपण २०२० मध्ये पोचलोही होतो. मात्र गेल्या ४ वर्षांपासून झालेली घसरण नक्कीच दखलपात्र आहे.‌ यांची गांभीर्याने दखल घेऊन आपला गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक विभाग कमी पडतोय का याची तातडीने शहानिशा करावी. अशी मागणी वेलणकर यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: