Pune Rain | पावसामुळे आज कुठले रस्ते बंद असणार? कुठल्या भागात पाणी जाण्याची शक्यता? सर्व जाणून घ्या 

Homeadministrative

Pune Rain | पावसामुळे आज कुठले रस्ते बंद असणार? कुठल्या भागात पाणी जाण्याची शक्यता? सर्व जाणून घ्या 

Ganesh Kumar Mule Aug 20, 2025 11:36 AM

Pune Traffic | शहरातील वाहतूक सुधारणा करण्याबाबत महापालिका आणि पोलिसांची संयुक्त बैठक!
Fursungi, Uruli Devachi Water Supply Scheme | फुरसुंगी, उरुळी देवाची पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाकडून २४ कोटी सात लाख मंजूर | खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांना यश
Property Tax collection | मिळकतकर वसुलीसाठी 75 अतिरिक्त कर्मचाऱ्यांची फौज  | अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 

Pune Rain | पावसामुळे आज कुठले रस्ते बंद असणार? कुठल्या भागात पाणी जाण्याची शक्यता? सर्व जाणून घ्या

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – शहरात गेल्या तीन दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात ३९ हजार कुसेक पाणी विसर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील काही पूल आणि रस्ते बंद करण्यात आले आहेत. तर काही भागात पाणी घुसण्याची शक्यता आहे. याबाबत पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष कडून लोकांना सावधान राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. (PMC Disaster Management Department)

. पुणे महानगरपालिका आपत्कालीन कक्ष संपर्क क्रमांक (२४४७ कार्यरत आहे )
१) ०२०-२५५०१२६९, २)०२०-२५५०६८००

पुणे शहरात व धरण क्षेत्रामध्ये पावसामुळे खडकवासला, मुळशी व पवना धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या स्थितीची सविस्तर माहिती
पानशेत, वरसगाव व टेमघर धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे खडकवासला धरणातून द१९/०८/२०२५ रोजी संध्याकाळी ०७:०० वाजता ३५,३०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. तसेच २०/०८/२०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता ३९,००० क्युसेक्स इतका विसर्ग करणेत येणार तसेच पवना धरणातून १५००० क्युसेक व मुळशी धरणातून ३१,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला आहे.

हे रस्ते, पूल असणार बंद

१. शिवणे

२. नांदेड सिटी

३. भिडे पूल

४. नदी काठचा रस्ता

पुणे महानगरपालिकेकडून मुठा व मुळा नदीच्या लगतची वस्ती, सोसायटी व भाग या ठिकाणी सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या असून प्रतिसाद यंत्रणा तैनात केली आहे. त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

सदर पाण्याचा विसर्ग मुठा व मुळा नदीमध्ये सोडल्यामुळे पुणे शहरातील नदीपात्राच्या लगतच्या भागांमध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे .सदरचे भाग खालील प्रमाणे आहेत :-

१. वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय – खिलारे वस्ती, राजपूत झोपडपट्टी, तपोधाम
२. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय एकता नगरी निबजनगर
३.शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालय – पुलाची वाडी तसेच भिडे ब्रिज, ओंकारेश्वर मंदिर, पाटील इस्टेट ४. येरवडा क्षेत्रीय कार्यालय – शांतीनगर, लक्ष्मीनगर, विश्रांतीनगर
५. ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय -ताडीवाला रोड या ठिकाणी वस्तीमध्ये पाणी जाऊ शकते. ६. औंध क्षेत्रीय कार्यालय-औंध, बोपोडी, दापोडी, खडकी

पुणे महापालिकेने संबंधित ठिकाणी ३३ (एकूण ७१) मदत केंद्राची स्थापना केली आहे. या ठिकाणी महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून सर्च अँड रेस्क्यू टीम्स उपलब्ध करून दिले आहेत. त्याचप्रमाणे नजीकच्या ठिकाणी मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था व त्याप्रमाणे आवश्यक आरोग्याची व्यवस्था करून ठेवण्यात आलेली आहे.

नागरिकांना सूचना देण्याकरिता आकाशवाणी पुणे, FM Radio, पुणे महानगरपालिकेच्या सोशल मिडिया याद्वारे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत आला असून सहकार्य करण्याचे आव्हान करणेत आले आहे.

पुणे महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालय मधील सर्च अँड रेस्क्यू करता स्टाफ संबंधित ठिकाणी उपस्थित आहे. पुणे शहरामध्ये उद्भवलेल्या परिस्थितीमुळे नागरिकांना संपर्काकरता आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत आहे.सदर कक्षा मधून सी-डॅक, हवामान विभाग, यांच्याशी समन्वय ठेवून हवामान विषयी माहिती प्राप्त करणेत येत आहे. तसेच वाहतूक पोलिसांशी समन्वय ठेवण्यात येत आहे. सिंचन विभागाकडून दर तासाला पाण्याच्या विसर्गाची अद्ययावत माहिती घेण्यात येत आहे, त्यासाठी सिंचन विभागाचे नियंत्रण कक्षात पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता यांची नेमणूक करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या नियंत्रण कक्षात पोलीस बिनतारी यंत्रणा, अग्निशमन विभाग, पथ विभाग, मलनिःसारण विभाग याकडील कर्मचाऱ्यांची तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील कर्मचाऱ्यांची नेमणूक करणेत आलेली असून यानुसार सर्व विभागांशी समन्वय साधण्यात आलेला आहे.

काल  झालेल्या पावसामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे एकूण १६ तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने ड्रेनेज चोकअप होणे, रस्त्यावर पाणी साचणे या स्वरूपाच्या तक्रारी होत्या संबंधित क्षेत्रिय कार्यालयामार्फत सदर ठिकाणी टीम पाठवून सदर तक्रारींचे निराकरण करण्यात आलेले आहे. तसेच दि. २०/०८/२०२५ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत एकतानागरी, पुलाची वाडी, येरवडा व वारजे या ठिकाणी पाणी साठल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून तत्यांचे निरसन करण्यात आले आहे.
सिंहगड रोड वरील एकता नगरी तसेच नदीकाठावरील पुराने बाधित होऊ शकणाऱ्या डेक्कन पुलाची वाडी या ठिकाणी क्षेत्रिय कार्यालयाकडील तसेच अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, घनकचरा विभाग यांचेकडील पथके तैनात करण्यात आलेली असून सदर ठिकाणी अग्निशमन विभागाचे बंब, बोट, रुग्णवाहिका, बाधित नागरिकांचे स्थलांतर करणेसाठी आवश्यक वाहनांची व्यवस्था करणेत आलेली आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी मदत केंद्रांमध्ये स्थलांतरीत करणे करिता PMPML च्या बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे…

नागरिकांना मेगाफोन द्वारे सुरक्षित स्थळी स्थलांतर करणेबाबत सूचना देण्यात येत आहे. धोक्याची सूचना देणारे व संपर्क क्रमांक दर्शवणारे फलक सदर ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. पाण्याचे उपसा करणारे पंप तैनात करणेत आलेले आहे. किमान २५ कामगारांचे पथक तैनात केलेले आहे. आत्ता पर्यंत वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यलयाच्या हद्दीतील खिलारे वस्ती येथील २५ व तपोधाम येथील ३० नागरिकांचे निवाराकेंद्रात स्थलांतर केलेले आहे.तसेच येरवडा येथे १३२ नागरिक व नगर रोड येथे २५ नागरिकांचे स्थलांतर करून निवारा केंद्रांत व्यवस्था करणेत आली आहे.

नवल किशोर राम, महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी एकता नगर येथे घटना स्थळी जाऊन पूर परिस्थितीची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला आहे. तसेच  पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) यांनी वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय, शिवाजीनगर क्षेत्रिय कार्यालय व येरवडा क्षेत्रिय कार्यालय या ठिकाणी पुराने बाधित होणाऱ्या ठिकाणी पाहणी केली आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: