Pune Railway Station Insanity | पुणे रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता! | घनकचरा विभागाच्या उपायुक्त यांनी रेल्वे प्रशासनाला मागितला खुलासा 

Homeadministrative

Pune Railway Station Insanity | पुणे रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता! | घनकचरा विभागाच्या उपायुक्त यांनी रेल्वे प्रशासनाला मागितला खुलासा 

Ganesh Kumar Mule Dec 11, 2024 8:26 PM

Dr Yogesh Mhase IAS PMRDA | बांधकामासाठी लागणार वृक्ष प्राधिकरण सम‍ितीची परवानगी!
International Right to Information Day | पुणे महापालिका साजरा करणार  “आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन”! 
MLA Sunil Kamble | आमदार सुनील कांबळे यांच्या प्रयातनातून सुटला 40 वर्षा पासून रखडलेल्या  वाहतूक कोंडीचा प्रश्न !

Pune Railway Station Insanity | पुणे रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता! | घनकचरा विभागाच्या उपायुक्त यांनी रेल्वे प्रशासनाला मागितला खुलासा

 

PMC Solid Waste Management Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका घनकचरा विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) पाहणीत रेल्वे स्टेशन परिसरात (Pune Railway Station area) अस्वस्थताचे साम्राज्य दिसून आले आहे. त्यामुळे उपायुक्त संदीप कदम (PMC Deputy Commissioner Sandip Kadam) यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र लिहीत दंडात्मक कारवाई का करू नये, याबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे. (Pune PMC News)

उपायुक्त कदम यांच्या पत्र नुसार मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम २९६ अन्वये महानगरपालिकेम कोणत्याही जागेतील स्वच्छतेबाबत खात्री करून घेण्याच्या प्रयोजनासाठी तिची पाहणी करता येऊ शकते. या नियमानुसार आज पुणे रेल्वे स्थानक परिसर व पार्किंग जागा पहाणी केली असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली आहे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील प्रकरण १४- स्वच्छता विषयक तरतुदीनुसार संबंधित जागेत सार्वजनिक स्वच्छता राखणे, केरकचरा साठू न देणे ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच पुणे महानगरपालिका, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य उपविधी २०१७ मधील प्रकरण ५ अन्वये कचरा निर्माण करणा-या आस्थापनांनी आस्थापनेमध्ये सार्वजनिक स्वच्छता राखणे बंधनकारक असून मुद्दा क्र. १६ अन्वये या नियमांचे पालन न करणा-या निर्मात्यांना महानगरपालिका कठोर शास्ती लागू करू शकते.

उपायुक्त यांनी पुढे आपल्या पत्रात म्हटले आहे कि,  परिसरात पहाणी केली असता अंतर्गत परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले आहे. रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत परिसरात झाडणकाम केलेले नसून, केरकचरा, पालापाचोळा अनेक दिवसांपासून पडून असल्याचे, झाडांच्या कापलेल्या फांद्या अस्ताव्यस्त पडलेल्या असल्याचे आढळून आले. फुटपाथ नादुरस्त स्थितीत असल्याचे दिसून आले आहे. तसेच नागरीकांमार्फत उघड्यावर लघुशंका केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच अनेक प्रवासी नागरिकांमार्फत देखील इतरत्र कचरा टाकला जात असल्याचे आढळून आले आहे. तसेच उपड्यावर धुम्रपान व धुंकणे असे प्रकार प्रवाशांमार्फत होत आहेत. तसेच स्टेशन परिसरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ मोठ्याप्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्या, दारुच्या बाटल्या व अस्वच्छता असल्याचे स्थानिक आरोग्य निरीक्षक यांच्या पहाणी दरम्यान निदर्शनास आले आहे.

काल क्षेत्रिय कार्यालयामार्फत पुणे स्टेशन परिसरात डीप क्लिन ड्राईव्ह घेऊन स्वच्छता करण्यात आलेली आहे. परंतु रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत परिसरात दैनंदिन स्वरूपात स्वच्छता राखणे, प्रवासी नागरिकांमध्ये स्वच्छता राखणेच्या अनुषंगाने जनजागृती करणे, अस्वच्छता करणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे, ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी आहे. मद्यस्थितीत निदर्शनास आलेल्या या अस्वच्छतेमुळे अनारोग्यकारक परिस्थिती निर्माण होत असून दैनंदिन स्वरूपात येणा-या-जाणा-या नागरिकांच्या आरोग्यास यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.

आपल्या आस्थापनेमध्ये स्वच्छता न राखल्याकरणास्तव मुंबई प्रांतिक अधिनियम १९४९ मधील कलम ३९२ अन्वये आपणावर दंडाची शास्ती का करण्यात येऊ नये याबाबतचा खुलासा हे पत्र मिळताच दोन दिवसांचे आत सादर करावा. तमेच संपूर्ण रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत परिसरात स्वच्छता करून घेऊन, साठलेला केरकचरा, राडारोडा, पालापाचोळा, झाडांच्या फांद्या तात्काळ उचलून घ्याव्यात. तसेच अंतर्गत परिसरातील शौचालयांची स्वच्छता करून घ्यावी व उघड्यावर लघुशंका करणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी ही आपले विभागाची असून त्यानुसार संपूर्ण परिसरात सदैव स्वच्छता राखली जाईल याची दक्षता घेणेत यावी. असे कदम यांनी पुढे म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0